23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडबियाणी यांच्या पत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा

बियाणी यांच्या पत्नीने दिला आत्मदहनाचा इशारा

एकमत ऑनलाईन

नांदेड : विशेष प्र्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योगपती संजय बियाणी यांची हत्या होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. तरीसुद्धा मारेक-यांचा शोध स्थानिक पोलिसांना घेता आला नाही. या हत्येचा लवकरात लवकर तपास लागावा आणि आरोपी गजाआड व्हावेत यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी सी.बी.आय. तपासाची परवानगी द्यावी, अशी मागणी सोशल मिडियातून आवाहन करीत स्व.संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी केली आहे. एवढेच नव्हे स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेऊन सी.बी.आय.चौकशी करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. येथेही न्याय न मिळाल्यास थेट आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे.

नांदेड शहरात व जिल्हाभरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रोज अनेक गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. दरोडे, खून, नागरिकांना भरदिवसा लुटणे आदी घटना सामान्य झाल्या आहेत. अनेक गुन्ह्यामध्ये केवळ गुन्हे दाखल करून पोलीस मोकळे होत आहेत. यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. काही गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्याचा फायदा घेत दि.५ एप्रिल रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची भरदिवसा त्यांच्याच घरापुढे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अज्ञात दोन मारेक-यांनी अंधाधुंद केलेल्या गोळीबारात बियाणी यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे सी.सी.टी.व्ही. कॅमे-यात कैद झाले आहे. बियाणी यांच्या हत्येचा तातडीने तपास करावा अशी मागणी व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांतून मोठ्या प्रमाणात झाली. अनेक ठिकाणी आंदोलनही झाले. हा दबाव वाढल्याने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी स्वत: राज्याच्या गृहमंत्र्यांची भेट घेऊन हत्येचा तपास लवकरात लवकर लावला जाईल, अशी ग्वाही दिली होती. तर दुसरीकडे भाजपाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास थेट सि.बी.आय. मार्फत करावा, ही मागणी सुरुवातीपासूनच लावून धरली.

याच मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्यावतीने स्थानिक पोलीस व राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलनही केले. संजय बियाणी यांची हत्या होऊन जवळपास ३४ दिवसाचा कालावधी उलटला आहे. स्थानिक पोलिसांनी हत्येच्या तपासासाठी एस.आय.टी. स्थापन करून मारेक-यांचा शोध लवकरात लवकर घेऊ, असा दावा केला होता. तपासासाठी शहरासह जिल्ह्यात रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची पोलिसांनी धरपकड केली. गावठी पिस्तुल, तलवार, खंजीर आदी शस्त्रेही जप्त केली. परंतु या कारवाईपलिकडे संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा अद्यापही पोलिसांना करता आला नाही. केवळ तपास सुरू आहे, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या याच भूमिकेला कंटाळून संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनीच आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून तो सी.बी.आय.कडे वर्ग करावा, सी.बी.आय.ला तपासाची परवानगी देण्यात यावी, यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

तपासासाठी पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांना सोशल मिडियातून आवाहन करीत अनिता बियाणी यांनी न्यायालयात याचिका दाखल तर करणारच आहे पण राज्य शासनाकडूनही न्याय न मिळाल्यास मुंबई येथेच आत्महत्या करेन, असा इशारा दिला आहे. यामुळे नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या