24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडराज्यसभेतील विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव साजरा

राज्यसभेतील विजयाचा भाजपकडून आनंदोत्सव साजरा

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले आहे. या विजयाचा अर्धापुर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि. ११ जून रोजी महात्मा बसवेश्वर चौकात फटाक्याची अतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

राज्यात नुकत्याच राज्यसभेच्या सहा जागेसाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे तीन पैकी तीन उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्याकडे दोन जागेचे संख्याबळ असताना तिस-या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. या जागेसाठी झालेल्या अटीतटीच्या निशडणूकीत भाजपने विजय मिळविला. या विजयाचा अर्धापुर शहरात भाजपच्या वतीने शनिवारी महात्मा बसवेश्वर चौकात भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी यांच्या नेत्वाखाली फटाक्याची अतिषबाजी, गुलालाची उधळन व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, शहराध्यक्ष विलास साबळे, नगरसेवक बाबुराव लंगडे, तालुका महामंञी अवधुतराव पाटील कदम, माजी जि. प. सदस्य रामराव भालेराव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष जेटनराव मुळे, शहराध्यक्ष तुकाराम माटे, अमोल कपाटे, अनिल बाच्चेवार, शैलेष लोमटे, कुश पाटील भांगे, सखाराम क्षिरसागर, संतोष पवार, गोविंद लंगडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या