माहूर : भाजपा नेते विद्यमान आमदार तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी दि. ६ जुलै रोजी सपत्नीक कुलस्वामिनी रेणुकामाता व भगवान दत्तात्रेय स्वामींचे दर्शन घेतले.
सत्तांतरानंतर लगेचच आ. शेलार यांनी माहूरगड गाठून श्री रेणुका माता,भगवान दत्तात्रेय स्वामींचे दर्शन व प. पू. प.महंत मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले.मातेच्या दर्शना नंतर मंदिर कार्यालयात विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय काण्णव यांनी आमदार महोदयांचा सपत्नीक सत्कार केला.
दत्तशिखर शिखर संस्थानच्या प्रांगणात माहूर तालुका भाजपच्या वतीने माहूरचे योगी प.पू.श्यामबापू भारती महाराज, धरमसिंग राठोड, युवा नेते अॅड.रमण जायभाये, तालुकाध्यक्ष अॅड. दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष सागर महामुने, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे,महीला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे, नंदकुमार जोशी,अच्युत जोशी, निळकंठ मस्के, विनायक मुसळे, रामकिसन केंद्रे, शामराव कुमरे,हर्षदीप दीक्षित, जीवन अग्रवाल, राजू दराडे, नंदकुमार कोलपवार, अनिता कुमरे, पद्मजा गि-्हे यांचेसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.