अर्धापूर : भोकरफाटा येथील भारतीय कापूस निगम लि. च्या कापूस खरेदी केंद्रावर शेतक-यांच्या कापसाचा दर्जा ठरवून कापूस खरेदीसाठी विरोध करून शेतक-यांचा कापूस परत पाठविले जात असताना कापूस खरेदी झाला पाहिजे. या मागणीसाठी भाजपाचे कार्यकर्ते अमोल कपाटे यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच नागरीक व पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आणि शेवटी कापूस खरेदी सुरू झाली.
अधार्पूर तालुक्यातील भोकरफाटा येथे सी.सी.आय. ची कापूस खरेदी सुरू झाली असून दि.१८ नोव्हेंबर पासून भोकरफाटा येथे सालासार जिनिंग मध्ये भारतीय कापूस निगम लिमिटेडची खरेदी सुरू झाली आहे. या खरेदी केंद्रावर शेतक-यांच्या कापसाचा दर्जा तपासून उच्च प्रतिचाच कापूस खरेदी केला जात होता. परंतु अनेक शेतक-यांचा काहीअंशी साधारण दजार्चा कापूस मात्र खरेदीविना परत पाठविला जात होता.
अशावेळी येळेगाव येथील एका शेतक-याने गेल्या दोन दिवसांपासून भोकरफाटा येथील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणला होता. पण सदरील कापसामधील काही चांगला दजार्चा कापूसच घेतो. आम्ही थोडाही खराब झालेला कापूस घेणार नाही. अशी तंबी देत शेतक-याला कापूस परत घेऊन जाण्यासाठी सांगत होते. वारंवार विनंती करूनही कंपनीचे संचालक ऐकत नसल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. त्यावेळी येथील खरेदीही शेतक-्यांनी थांबवली. ही माहिती मिळताच भाजपा युवा मोचार्चे माजी चिटणीस अमोल कपाटे यांनी शेतक-यांची बाजू घेऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण ऐनवेळी उपस्थित नागरिक व पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या प्रकारामुळे अमोल कपाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कार्यवाही केली. यावेळी भाजपाचे भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख, प्रभू कपाटे, बाबुराव क्षीरसागर, दत्ता कपाटे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. दुपारनंतर कापुस खरेदी सुरू शेतक-्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी अमोल कपाटे यांनी आत्महदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्यानंतर सदरील कापूस खरेदी केंद्रातील कर्मचा-यानी एक पाऊल मागे सदरील शेतक-याचा कापूसही खरेदी केला. तसेच इतरही शेतक-यांची खरेदी सुरू केली. सदरील खरेदी केंद्रावर बाराशेच्या वर शेतक-्यांची नोंदणी झाली असून इतरही ठिकाणी कापूस खरेदी सुरू होईल असे सांगण्यात आले
ट्विटरवर भारतीय रिझर्व्ह बँकेची चलती