Wednesday, September 27, 2023

दुधाच्या अनुदानासाठी जिल्ह्यात भाजपाचे आंदोलन

नांदेड : दुधाला प्रति लीटर १० रूपये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपाच्यावतीने रस्त्यावर दुध सांडवून तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवुन अनुदानासाठी मागणी करण्यात आली.

माहूर:- दुधाच्या अनुदानासाठी आंदोलने करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव कॉ .शंकर सिडाम, कॉ. किशोर पवार, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ राजकुमार पडलवार, कॉ. डॉ.बाबा डाखोरे, कॉ. चंद्रभान निलेवाड, कॉ. राजु राठोड, कॉ. संजय मानकर,रंजित जाधव , अविनाश राठोड, शंकर चव्हाण, सतराम पवार ,रायसिंग राठोड, भारत जाधव ,दशरथ जाधव, दयाराम जाधव ,मंगु महाराज, मोहन चव्हाण, राजु पिसरवाड, विष्णू पिंपळे ,आत्माराम पवार, सुशीला पवार ,आशा चव्हाण, पार्वती चव्हाण ,विमल पवार, वैशाली पवार, वृंदा पवार ,सृष्टी चव्हाण ,रमेश मेश्राम ,अरविंद राठोड, अतुल जाधव सह इतर कार्यकर्ते हजर होते.

नरसीफाटा : दुधाच्या अनुदानासाठी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी देविदास बोमणाळे , प्रा.जिवन चव्हाण , शहरध्यक्ष शंकर कल्याण , तालुका अध्यक्ष कोडिंबा पाटील यांनीही महाआघाडी सरकारवर सडकडून टिका केले .या आदोलंनात राहुल पाटील नखाते, रंजित कुरे, भगवान लंगडापूरे , दिलीपराव धर्माधिकारी , शिवाजी जाधव , नागेश पा काहाळेकर , दत्ता ढगे सावरखेडकर, शरद जाधव ,बालाजी घोसलवाड,गोविंद पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
कंधार : दुधाच्या अनुदानासाठी आंदोलन करण्यात आले. या वेळीभारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, भाजपा महिला मोर्चा चे जिल्हाध्यक्षा चित्राताई गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, भाजपा शहराध्यक्ष अ‍ॅड.गंगाप्रसाद यन्नावार, नगरसेवक सुनील कांबळे, मधुकर पा. डांगे, आदींची उपस्थिती होती

ईस्लापुर : आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपसभापती कपिल करेवाड माजी प.स. सदस्य मारोती माहुरकर, सरपंच देविदास पळसपूरे, उपसरपंच श्रीरंग पवार, प्रकाश भोयर, सिताराम बोरकर, संदीप वानखेडे, अजित भाई, स्वप्नील गरडे, प्रकाश दंडे, पांडुरंग जाधव, गजानन कदम, रमेश बोड्डेवाड, श्याम गरडे, शेख लतीफ, सुरज श्रीरंग, बालाजी काळे, अनिल, अरविंद, बालाजी वाघमारे, इम्रान, आकाश, प्रतीक, हरिभाऊ, सुधीर यांच्या सह परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंदोलन स्थळावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सदरच्या मागण्याचे निवेदन सपोनी सुशांत किनगे यांना देण्यात आले आहे.

धर्माबाद : दुधाच्या अनुदानासाठी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देवुन आंदोलन केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राम पाटील, रविंद्र पोतगंटीवार,नगरसेवक संजय पवार ,दताहरी पाटील आवरे,संजय पाटील रामपुरे, ललेश पाटील मंगनाळीकर, शहर अध्यक्ष रामेश्वर गंधलवार,आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयाच्या वतीने आलेल्या आदेशानुसार जिल्हाभर हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती अभियान जिल्हाप्रमुख श्रावण पाटील भिलवंडे यांनी दिली

हिमायतनगर : दुध अनुदानासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी जेष्ठनेते किशनराव वानखेडे काका,सुधाकर पाटिल,तालुका अध्यक्ष आशिष सकवान,भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी,शहर अध्यक्ष खंडू सर चव्हाण,राम जाधव,विनायक ढोणे,चांदराव कदम,अमोल सांगोळकर,हीदायद खान,प्रशांत ढोले,किशोर रायेवार,राहुल देवसरकर,शुभम संगनवार, रॉबीन चव्हाण, अमोल सूर्यवंशी सह आदि शेतकरी यावेळी या अंदोलनासाठी उपस्थित होते, भा.ज.पा. तर्फे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन झाल्या नंतर हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे साहेब,सहाय्यक पोलिस निरीक्षक इगळे साहेब ,बिट जमादार लपशेटवार साहेब यांनी हा मुख्य रस्ता पुन्हा वाहतूकिसाठी खुला करुण वाहतुक सुरळीत करुण दिली.

Read More  पालकमंत्री महाआघाडीचे की राष्ट्रवादीचे

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या