22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeनांदेडनांदेडात बोगस बियाण्यांच्या कंपनीचा पर्दाफाश

नांदेडात बोगस बियाण्यांच्या कंपनीचा पर्दाफाश

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : प्रतिनिधी
ंिपपळगाव शिवारात बोगस सोयाबीन बियाणे तयार करणा-या एका कंपनीचा
जागरूक नागरिकांनी पर्दाफाश केलाÞ नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कृषी अधिकारी व पोलीसांनी दिÞ २८ रोजी या कंपनीवर छापा टाकून शेकडोकिं्वटल बोगस बियाणे जप्त केले. सदर कंपनीत अनेक प्रकारचे बोगस बियाणे तयार करत असल्याचे आढळून आले आहे. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहेÞ

अर्धापूर तालुक्यातील ंिपपळगाव (म.) शिवारातील जैन पाईप गोडावूनच्या पाठीमागे असलेल्या दुस-या एका गोडावूनमध्ये दि. २८ मे रोजी मयुरी सिड्स आणि बुलेट ऍग्रो प्रॉडक्ट्स ही कंपनी बोगस बियाणे उत्पादन करित होती. यात सोयाबीन, उडीद, हरभरा ही बोगस बियाणे तयार केली जात होती. घरगुती सोयाबीन बियाणे म्हणुन विक्रीसाठी पॅंिकग होत असल्याची माहिती शेतकरी तथा संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे व भाजप तालुका सरचिटणीस अवधूतराव कदम यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही माहिती कृषी अधिकारी अनिल शिरफुले व अर्धापूर पोलिसांना दिली. त्यानंतर कृषी बोगस बियाणांचे उत्पादन करून त्याची विक्री करणा-या कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात कृषी विभागाने शेकडोकिं्वटल बोगस बियाणे जप्त केले आहे.

यावेळी कंपनीत सोयाबीन, उडीद, मूग, हरभ-याच्या बोगस बियाणांची पॅंिकग करण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गोदामातील सर्व बियाणे जप्त करण्यात आले आहे. हा छापा टाकल्यानंतर या गोदामात १००किं्वटल सोयाबीन, २०किं्वटल हरभरा, १००किं्वटल उडीद, पॅंिकग मशीन, ग्राइंडर मशीन जप्त करण्यात आले आहे. यावेळी कंपनीत २० कामगार काम करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कारमगारांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी अनिल शिरपुरे आणि पोलिसांच्या पथकाने हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणला असला तरी या कंपनीत प्रथम दर्शनी सोयाबीन, उडीद, हरभरा इत्यादी बियाणे तयार केली जात होती. या कंपनीने यापूर्वीही अशाच प्रकारे किती बियाणांची विक्री केली आणि अजून कोणत्या प्रकारचे बियाणे तयार केले जात आहे काय याची कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगालावे यांनी दिली आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडून काय कारवाई होते याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

मयुरी सिड्स नावाने विक्री: शिरफुले
बोगस बियाणे तयार करित असतांना छापा टाकण्यात आलेली ही कंपनी मयुरी सिड्स या नावाने बोगस बियाणांची विक्री करत होती. तर बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा बोर्ड, बँग वरील ठिकाण, लॉट नंबर, बॅच नंबर अशा अनेक चुका या कंपनीत कृषी विभागाच्या तपासणी वेळी निदर्शनास आल्या आहेत. अशी माहिती अर्धापूर तालुका कृषी अधिकारी अनिल शिरपुरे यांनी दिली आहे.

कडक कारवाई करावी : गव्हाणे
अगोदरच शेतकरी आर्थिक अडचणीत असताना काही बोगस कंपन्या स्वत:ची तुमडी भरण्यासाठी कायदा नियम धाब्यावर बसवून बोगस बियाणे तयार करीत आहेत. अशा प्रकारे बोगस बियाणांची विक्री करून शेतक-यांची फसवणूक करणा-या या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या