25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडआत्मदहन प्रकरणी दोघांना अटक

आत्मदहन प्रकरणी दोघांना अटक

एकमत ऑनलाईन

माळाकोळी : चोंडी येथील बहुचर्चित सामाजिक कार्यकर्ता शिवदास ढवळे आत्मदहन प्रकरणी दोन आरोपींना दिनांक दोन मे रोजी मध्यरात्री अटक करण्यात आल्या ची माहिती माळाकोळी पोलिसांनी दिली आहे माझी जिल्हा परिषद सदस्य यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर देविदास गीते व नातेवाईक गोविंद केंद्रे ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वन विभागाच्या हरीण व मोर यांच्या हत्येच्या चौकशीच्या मागणीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांनी दिनांक 16 मार्च रोजी निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता त्यानुसार त्यांनी दिनांक 28 एप्रिल रोजी आत्मदहन करणार असल्याचे सांगितले होते सदर प्रकरणी त्यांनी आपल्या निवेदनात माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास येथे माजी सरपंच सुदमता गीते स्वत: देविदास गिते सदाशिव गीते ज्ञानेश्वर गीते व गोविंद केंद्रे यांच्यासह काही व्यक्तींविरोधात व संस्था विरोधात निवेदन दिले होते मात्र वन विभाग व संबंधित संस्थांनी त्यांची चौकशी केले नसल्यामुळे शिवदास ढवळे यांनी दिनांक २८ एप्रिल रोजी निवेदना नुसार आत्मदहन केले सदर प्रकरणी आरोपींना आज पर्यंत अटक करण्यात आली नव्हती दिनांक २ मे रोजी रात्री उशिरा यातील दोन आरोपी गोविंद केंद्रे व ज्ञानेश्वर गीते यांना अटक करण्यात आल्याचे पोलीस विभागाकडून कळाले .

दोन आरोपी अटकेत मात्र वनविभागाच्या चौकशीचे काय?
सदर शिवदास ढवळे आत्मदहन प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे, एकूण सहा आरोपींपैकी दोन आरोपी अटक झालेले आहेत, शिवाय वन विभाग नांदेड यांना निवेदन देऊन शिवदास ढवळे यांनी आत्मदहन केले होते, वनविभाग यांची चौकशी करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले होते पण वन विभाग यांच्या चौकशी केल्याची कुठलीही माहिती अद्याप प्राप्त झाली नाही, वन विभाग व पोलिस यांना अभय दिले काय ? अशी चर्चा नागरिकांत होत आहे . सदर प्रकरणात निवेदन देऊन आत्मदहन करणार असल्याचे माहीत असूनही वन विभाग व पोलिस विभाग यांनी सदर प्रकरण गांभीयार्ने घेतले नसल्यामुळे शिवदास ढवळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता मग अशा प्रकरणात पोलीस विभागातील कर्मचारी व वन विभाग यांना त्यांचे वरिष्ठ अभय देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यांचीही चौकशी झाली पाहिजे व शिवदास ढवळे यांना न्याय मिळाला पाहिजे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

सैनिक पेशींचा धोकाही!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या