18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडपोलिसात तक्रार दिल्याने दोघांना मारहाण

पोलिसात तक्रार दिल्याने दोघांना मारहाण

एकमत ऑनलाईन

नांदेड : पोलीसात तक्रार दिल्याचा राग मनात धरून आरोपी एकास मारहाण करत असता भांडण सोडण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरूणासही चौघांनी मारहाण केल्याची घ टना इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मोहम्मद आदनान मोहम्मद यूसुफ (वय २२, राÞहतई करबला रोड,नांदेड) हा आपल्या मित्रासोबत हातजोडणी रोडवरील हसनैन मस्जिदजवळ उभा होताÞ त्यावेळी चार आरोपी तेथे आले व त्याच्या मित्राला आमच्या विरूद्ध पोलीसांत तक्रार का दिली असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केलीÞ

यावेळी त्याच्या सोबत असल्याने मोहम्मद आदनान यांनी मित्राला मारहाण होत असल्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र त्या चौघाही आरोपींनी हातातील लोखंडी रॉडने त्यांना व त्यांच्या मित्राला मारहाण केलीÞ या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झालीÞ त्यानंतर आरोपी फेरोेज उर्फ फिरोन यांने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलीÞ याप्रकरणी मोहम्मद आदनान मोहम्मद यूसुफ यांनी इतवारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोउपनि रायबोळे हे करीत आहेतÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या