29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडनिवघ्यात पुन्हा ब्रेक द चैन मुळे कोरोना रुग्न कमी व्हायला मदत

निवघ्यात पुन्हा ब्रेक द चैन मुळे कोरोना रुग्न कमी व्हायला मदत

एकमत ऑनलाईन

निवघाबाजार : सबंध महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्नाच्या संख्येत वाढ होत आहे, दररोज शेकडो जनाचे बळी जात आहे. या महामारीने ग्रामीन भागालाही सोडले नसल्याने मागील आठवडयात निवघा येथे दररोज एक कोरोनाचा बळी जात असल्याने व रूग्न संख्येत वाढ होत असल्याने येथील ग्रामपंचायतने ब्रेक द चैन चा निर्णय घेतला होता, त्याला व्यापारी मंडळी ने व ग्रामस्थाने प्रतिसाद दिल्याने कोरोना रूग्न संख्येत कमालीची घट झाल्याचा दावा ग्रामपंचायत ने केला आहे..

ब्रेक द चैन चा कालावधीचा आजचा रविवार शेवटचा दिवस असल्याने येथील व्यापारी तथा पॅनल प्रमुख मधुकर कदम यानी ग्रामपंचायत कार्यालय येथे लॉक डाऊन संदर्भात पुन्हा व्यापारी यांची बैठक घेऊन पुन्हा लॉक डाउन करायचे का? या बाबत निर्णय घेत सर्व व्यापा-यानी मागील आठवड्यात लॉ कडाउन मुळे कोरोना रूग्न संख्येत झपाट्याने घट झाली. व दवाखान्यातील रूग्नाची गर्दी कमी झाली, यामुळे कोरोनाची चैन तुटल्याचा दावा करत पुन्हा ३० एप्रील पर्यंत सर्व मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने हदगांव हिमायतनगरचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यानी स्वागत केले. व काळजी घेण्याचे आवाहान केले..आज ग्रामपंचायत मध्ये झालेल्या सर्व व्यापारी व दुकानदारांच्या बैठकीमध्ये सवार्नुमते कोरोनाची साखळी तोडण्याकरिता व आपल्या गावातील व परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता निवघा बाजारपेठ ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अत्यावश्यक सेवेत फक्त दवाखाने,मेडिकल, पाणी फिल्टर हे २४ तास सेवा सुरू तर दुध व्यवसाय, किराणा दुकाने व फिरस्ती भाजीपाला हे सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत… या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक सह व्यापारी मधुकर कदम, पोलिस उपनिरीक्षक दिपक फोलाने,अनंतकुमार जैन, रमेश इंदुलवार, संदीप शिंदे, दिलीप सोळंके, अविनाश पाथरकर,डॉ. सचिन जैन,पप्पु देशमुख इत्यादी व्यापारी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या काळात अवैध दारू विक्री बेभावात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या