उमरी : धमार्बादपोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या उमरी तालुक्यातील बोळसा या गावातशेतीच्या कारणावरून छोट्या भावाने केला मोठ्या भावाच्या पोटात खंजर खुपसून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
उमरी तालुक्यातील बोळसा रेल्वे टेशन या गावात दोन दोन भावाच्या शेतीच्या वादावरून शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारासआरोपी माणिक गंगाराम चिकटवाड याने त्याचा सख्या भाऊ धाराजी गंगाराम चिकटवाड वय 60 यास खंजरने पोटात भोसकले त्यामुळे पोटातील आतडे बाहेर निघाले तसेच मयताचा मुलगा दीपक चिकटवाड यासही डोक्याला दगडाने मारहाण करण्यात आली या दोघांना तत्काळ उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री १.३०.वाजताच्या सुमारासदाखल करण्यात आले यावेळी उपस्थित वैद्यकीय अधीक्षक डॉ शंकर चव्हाण यांनी धाराजी गंगाराम चिकटवाड वय ६० यास मृत्यू घोषित केले.
तर मयताचा मुलगा त्याला डोक्यातमार असल्याने नांदेडला हलविण्यात आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली . या घटनेनंतर भोकर येथील अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार धमार्बाद चे उपअधीक्षक सुनिल पाटील पो .नि. सोहन माछरे .सपोनि कराड याच्यासह पोनिक कर्मचा-यांनी घटनास्थाळी भेट दिली . दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी भेटी दिल्या असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले.
Read More हिंदुस्तान शिपयार्डमध्ये मोठी दुर्घटना, क्रेन कोसळल्याने 11 कामगारांचा मृत्यू