36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडधर्माबाद येथील बीएसएनएल सेवा विस्कळीत

धर्माबाद येथील बीएसएनएल सेवा विस्कळीत

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : तालुक्यातील अनेक गावात बी.एस.एन.एल.सेवा विस्कळीत झाल्यामुळे याचा फटका अनेकांना बसत असून शासकीय व निमशासकीय कार्यालयातही लहान मोठ्या कामासाठी नागरीकांना वारंवार खेटे मारावे लागत आहे.त्यामुळे तालुक्यातील बी.एस.एन.एल सेवा सुरळीत करण्याची मागणी केंद्रीय दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष मौगला गौड यांनी बी.एस.एन.एल.च्या बैठकीत केले आहे.

खा तापराव पाटील चिखलीकर यांच्या शिफारशीवरून माजी उपनगराध्यक्ष मौगला गौड व भोकरचे उधोगपती दिलीपराव सोनटक्के यांच्यासह जिल्ह्यातील अनेक जणांची केंद्रीय दूरसंचार सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड झाली होती.निवड झाल्यापासून पहिल्यांदा बी.एस.एन.एल.ची बैठक नांदेड कार्यालयातील सभागृहात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत दि.२४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली आहे.

सदरील बैठकीत नवनिर्वाचित सर्व निवड झालेल्या सदस्यांचे संबंधित मुख्य अधिकारी यांनी सत्कार केले आहे.यावेळी केंद्रीय दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य तथा माजी उपनगराध्यक्ष मौगला गौड यांनी धमार्बाद तालुक्यातील येताळा,बन्नाळी,करखेली,जारीकोट,कारेगाव व इतर गावात बी.एस.एन.एल.सेवा विस्कळीत झाल्यामुळे नागरीकांना व ग्राहकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.ग्राहकांना सोयी व सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे बी.एस.एन.एलचे ग्राहक इतर खाजगी कंपनीकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहेत.त्यामुळे सदरील प्ररकरणामुळे आपल्याला विभागाचा महसुल बुडत आहे व जनतेची आर्थिक पिळवणूक होत आहे

धमार्बाद तालुक्यातील विस्कळीत झालेली बी.एस.एन.एलची सेवा सुरळीत करावे, तालुक्यातील बन्नाळी व बाळापुर येथे नवीन टॉवर उभारण्यात यावे, येथील कार्यालयात कायमस्वरुपी जे.टी.ओ व इतर रिक्त पदे तात्काळ भरावे, येथील बी.एस.एन.एल.कार्यालयात कॅश काऊंटर सुरू करावे,यासह अनेक प्रश्नांचा भडीमार मौगला गौड यांनी केला आहे.तालुक्यातील बहुतांश शासकीय व निमशासकीय कार्यालयात बी.एस.एन.एलचे कनेक्शन असल्यामुळे सदरील सेवा सुरळीत नसल्यामुळे याचा फटा बँक व इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयास बसत असल्यामुळे जनतेला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.माजी उपनगराध्यक्ष मौगला गौड यांनी पहिल्यास बैठकीत धमार्बाद तालुक्यातील अनेक विस्कळीत झालेले अनेक प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी गौड यांचे कौतुक केले आहे.सदरील बैठकीस सर्व नवनिर्वाचित सदस्य व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

देशातील गाढव नामशेष होण्याच्या मार्गावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या