भोकर : शहरातील शहीद प्रफुल्लनगरात भरदिवसा घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह तीन लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २५ जून रोजी घडली असून चोरीच्या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असुन पोलीसांची निष्क्रीयता वाढली आहे.
शहरातील प्रफुल्लनगर भागांतील भाड्याच्या घरात राहणारे व्यापारी म.गयासोद्यीन म. अजिजोद्यीन यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी १ ते ३ च्या दरम्यान नेहरूनगर मुलीकडे घरास कडीकोंड्यासह कुलुप लावून जेवणासाठी गेले होते. यावेळी पाऊस सुरू असल्याने फियार्दीचा मुलगा टाकालेले कपडे काढण्यासाठी घरी आला असता घराचे कुलूप तोडल्याचे लक्षात आल्याने त्याने वडीलास येथे रहाणा-्या वाळत आपल्याम.गयासोद्दीन यांनी चोरीच्या घटनेची फिर्याद भोकर पोलिसांकडे दिली.
अज्ञात चोरट्यानी भिंतीवरून उतरून घराचे दार तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक तोडून कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे ३ लाख २५ हजार चाळीस रुपयाचे दागिने व नगदी ६५ हजार रुपये असा एकूण ३ लाख ९० हजार चाळीस रुपयाचा मुद्येमाल घेऊन चोरटे पसार झाल्याचे फियार्दीत नमूद केले आहे.
चोरीच्या या घटनेची दखल घेवून पोलीसांनी तात्काळ घटना स्थळाची पाहणी केली.
श्वान पथकास बोलावून व चोरट्यांचा माघ काढण्याचा प्रयत्न केला परंतू चोरटे हाती लागले नाही. या घटनेचा तपास उपविभागिय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विकास पाटील याच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुरन. २३२ कलम ४५४, ३ ८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्ग दर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे हे पुढील तपास करत आहेत.
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली वावरत असून पोलिसांनी रात्रीला गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.