25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeनांदेडदोन ठिकाणी घरफोडी; साडे चार लाखांचा ऐवज लंपास

दोन ठिकाणी घरफोडी; साडे चार लाखांचा ऐवज लंपास

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घरफोडीच्या घटनेत चोरट्यानी साडे चार लाखाच्या मुद्देमालावर हात साफ केला आहे. पहील्या घटने माहुर तालुक्यातील सारखणी येथे चोरट्यानी १९ हजार ५०० चा मुद्देमाल चोरला तर कं धार तालुक्यातील आलेगाव येथे चोरट्यांनी २७ हजाराच्या मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही महीन्यापासुन जिल्ह्यात चो-यांचे प्रमाण वाढले आहे. दररोज लुट, चोरी, घरफोडी आशा घटनामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. चोरट्याना कुठलेही पोलिसांचे भय नसल्याने चोरटे सुसाट चो-यां करताना दिसत आहे. एवढ्या चो-यांच्या घटना घडूनही पोलिस प्रशासनाकडून कुठलीही मोठी कारवाई होताना दिसत नाहि. दरम्यान मागील दोन दिवसात दोन घरफोड्यांच्या घटना घडल्या असुन या जवळपास साडे चार लाखाच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हाथ साफ केला आहे. यात पहील्या घटनेत सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे सारखणी ता. माहुर येथे अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी गणपत रामजी पेटकुले रा. करंजी यांचा मोटार रेपेरींगचा व्यवसाय असुन त्यांच्या दुकानाचे चोरट्यांनी शटर तोडून दुकानातील सिआरआय कंपणीची जुनी मोटार व मोटारीची ओपन स्पेअर बाईंडींग वायर असा १९ हजार ५०० रूपय किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी गणपत रामजी पेटकुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुस-या उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे आलेगाव ता. कंधार येथे फिर्यादी मुरलीधर शंकर वर्ताळे रा. आलेगाव हे व्यवसायाने व्यापारी असुन त्यांचे गावातच किराणा दुकान असुन सदरील दुकानाच्या भिंतीच्या विटा काढुन चोरट्यांनी आत प्रवेश केला. आत प्रवेश करून दुकानात असलेल्या काऊंटरमधील ठेवलेले नगदी २७ हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी व्यापारी मुरलीधर शंकर वर्ताळे यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन,या प्रकरणी अधिक तपास पोना श्रीमंगले हे करीत आहेत. दरम्यान जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चो-या, लुटमार, घरफोडी अशा घटनांत वाढ झाल्याने याविरुध्द पोलिस विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

लातूर जिल्ह्यातील ६ लाख ७२ हजार नागरिकांची कोरोना चाचणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या