23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडपोलिसांनी जप्त केलेली चारचाकी जळून खाक

पोलिसांनी जप्त केलेली चारचाकी जळून खाक

एकमत ऑनलाईन

नांदेड : अचानक लागलेल्या आगीत पोलिसांनी जप्त केलेली तीन चारचाकी वाहने जळून खाक झाली. ही घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्यालगत मंगळवारी दुपारी घडली. या आगीमुळे पोलिसांसह रस्त्यावरून जाणा-या लोकांची धावपळ उडाली. गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे.

तापमान वाढीने आगीच्या घटनांत वाढ झाली आहे. शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याअंतर्गत जप्त करून ठेवलेल्या वाहनांचा मंगळवारी अचानक आग लागली. ही माहिती मिळताच अग्निशमन दल वाहनासह घटनास्थळी पोहोचून आग विझवलीÞ पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस ठेवण्यात आलेल्या मारोती ओमीनी, टाटा विस्टा व टाटा सुमो ही तीन चारचाकी वाहने या आगीत जळून खाक झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या