34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडजळालेल्या ऊसाची केली साखर

जळालेल्या ऊसाची केली साखर

एकमत ऑनलाईन

लोहा : डोंगरगाव ता. लोहा येथील ११ शेतक-यांचा जवळपास ३५ एकर ऊस शॉटसर्किट झाल्यासमुळे जळून खाक झाला होता. अर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांचा ऊस नेण्यासाठी कोणताही कारखाना ऊस घेत नव्हता. मात्र जामगा शिवणी येथील धाराशिव कारखान्यचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी शेतक-यांचा ऊस नेवून त्याची साखर केली. त्यामुळे डोंगरगावच्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

धाराशिव साखर कारखाना युनिट३ शिवणी जा. लोहा येथील डोंगरगाव ता.लोहा येथील ११ शेतक-्यांच्या ३५ एकर लागवड असलेला ऊसाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्थ झाले होते, वर्षभराची मेहनत आणि येणा-्या वर्षातली स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर जळत होते. आग लागल्यावर इतर कारखान्यावर संपर्क केला पण कोणीही दखल घेतली नाही. शेतक-यांनी पाटील यांच्याशी संपर्क केल्यास त्यांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तात्काळ जनरल मॅनेजर व शेती विभाग यांना सूचना दिल्या तसेच तातडीने ऊसाची तोड करण्यासाठी ७ ते ८ टोळ्या पाठवल्या, व अवघ्या ३ ते ४ दिवसामध्ये जळीत ऊस गळपास आणला.

याआधी डोंगरगाव परिसराच्या जवळपास कारखाना नसल्यामुळे मुबलक पाणी असूनही कुणी उसाचे उत्पन्न घेत नसे आणि अपवादाने कुणी घेतलेच तर ऊस बाहेरच्या कारखान्यावर द्यावा लागत असे व त्यामुळे शेतक-्यांची गैरसोय होई आणि हातात उत्पन्न ही कमी येत असे. त्यामुळे उसाची लागवड केल्या जात नसे. पण धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन.पाटील यांच्या प्रयत्नातून डोंगरगावच्या परिसरात कारखाना सुरु झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पन्न घेऊ लागले. साहजिकच यामुळे शेतक-्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे..पाटील यांच्या समय सूचकतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे शेतक-्यांचे होणारे लाखो रुपयाचे नुकसान टळले. या भावनेतुन शेतक-यांनी.पाटील यांची भेट घेऊन धन्यवाद दिले.पाटील यांनी आपण जे केले ते आपले कर्तव्यच होते. असे म्हणून शेतक-्यांचे आदरपूर्वक आभार. अभिजीत पाटील यांनी मानले.

या भेटी प्रसंगी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.. खंडेराव नागनाथ जाधव, धाराशिव साखर कारखान्याचे संचालकह्याागवत चौगुले,ह्याुहास शिंदे, जनरल मॅनेजर ढाके, शेतीविभाग अधिकारी शिंदे, .चंद्रशेखर दिगांबर जाधव, .राघोबा उत्तमराव जाधव, सौ.पुष्पाबाई प्रकाश जाधव, .माधव धोंडिबा जाधव, .उमाकांत आत्माराम जाधव, .सूर्यकांत संभाप्पा मुंदाळे, .संतोष जामगे व ऊस उत्पादक संघाचे सदस्य तसेच डोंगरगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

५ हेक्टर ५५ आर गायराण जमीन शेतक-यांच्या नावावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या