25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडचक्क मिरचीच्या पिकात गांजाची लागवड ; २३ किलो गांजा जप्त

चक्क मिरचीच्या पिकात गांजाची लागवड ; २३ किलो गांजा जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : शेतात मिर्चीच्या पिकात गांजाची लागवड केल्याचा भांडाफोड नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने केला आहे.या कारवाई २३ किलो १८६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंधार तालुक्यातील शेत गट क्र. २६६ मौ. गुंटूर येथे गांजा पिकविला जात आहे. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झाली होती.त्यांनी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांना ही माहिती देऊन आपल्या सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार हजेरीमेजर गोविंद मुंडे, गुंडेराव करले, गंगाधर कदम, चव्हाण, विठ्ठल शेळके, बालाजी यादगीरवार आणि शिंदे यांना मौ. गुंटूर येथे पाठविले.

त्याठिकाणी सचिन सोनवणे यांनी या प्रकरणाची सर्व शासकीय आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींची पुर्तता करताना तहसीलदार राजेश पाठक, पोलीस निरीक्षक गोबाडे, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, फोटोग्राफर, तराजु काटेवाला, शासकीय पंच असे सोबत घेऊन मौ. गुंटूर येथे शेत गट क्र. २६६ मध्ये पोहचले. तेथे पांडूरंग नागोबा खंदाडे वय ६६ हा व्यक्ति आढळून आला तर शेतातील मिर्चीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. या सर्व गांजाची मोजणी करून २३ किलो १८६ ग्रॅम जप्त केला.

त्याची किंमत पोलिसांनी १ लाख १५ हजार ९३० रुपये एवढी असल्याचे पोलिसांनी पंचनाम्यात लिहिले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे यांच्या तक्रारीवरून पांडूरंग नागोबा खंदाडे विरूद्ध आमली पदार्थ प्रतिबंधक कायदाप्रमाणे कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास कंधारचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

चिंता कायम, देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या