37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडएसटीत गळफास घेऊन वाहकाने केली आत्महत्या

एसटीत गळफास घेऊन वाहकाने केली आत्महत्या

एकमत ऑनलाईन

माहूर : एसटी महामंडळाच्या माहूर आगारात कार्यरत वाहकाने चक्क एसटी बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.दरम्यान सतत नादुरूस्त राहणा-या तिकीट मशीनमुळे कारवाईस सामोरे लागत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.यामुळे नादुस्त तिकीट मशीन आणि कारवाईच्या धास्तीने वाहकाचा बळी घेतला अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

एसटी महामंडळाच्या माहूर आगारातील वाहक संजय संभाजी जाणकार ( ५३ ) यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.सफाई कर्मचारी लक्ष्मीबाई व्यवहारे यांना एस . टी.बस क्रमांक एम.एच. २० बी.एल .४०१५ मध्ये संजय संभाजी जाणकार यांचा दोरीने लटकलेला मृतदेह दिसून आल्याने त्यांनी ही माहिती इतर कर्मचा-यांना दिली. आत्महत्या पूर्वी सदरची सुसाईट नोट कर्मचा-यांच्या व्हॉट्सप ग्रुपवर वाहकाने टाकल्याने घटना स्थळी रापम प्रशासना विरूद्ध रोष व्यक्त करण्यात येत होता.सुसाईट नोटमध्ये जाणकार यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ईटीआयएम अर्थात तिकीट मशीन नादुरुस्त असल्याने वाहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून बिघाड असलेल्या मशिनी द्वारे वाहक आपली कामगिरी बजावत आहे.

त्यात खोट्या अहवालाने निलंबित व सेवेतून बडतर्फ होत आहेत.दि.२४ रोजी माहूरवरून महागाव साठी साडे तीन प्रवासी घेतले , मात्र मशिनित बिघाड असल्याने साडे तीन ऐवजी एक तिकीट प्रिंट झाली.ही अपंगासाठी असलेली तिकीट बाहेर आली.हे सारा प्रकार सुरू असताना धनोडापर्यंत गाडी पोहचली.परिणामी तपासणीत माझ्यावर केस दाखल झाली . आता मला निलंबित केले जाईल नातेवाईक सह आणि रापम कर्मचा-यात माझी बदनामी होईल , प्रत्येक जण मला चोर समजेल.त्यामुळे माझी बदनामी होईल.आगारात सदर ची मशीन चेक केली जाईल, बिघाड दुरुस्त करून खोटा अहवाल दिला जाईल.व मला दोषी ठरविले जाईल.मशीन योग्य असती तर तिकीट योग्य निघाली असती माझी बदनामी झाली नसती.माझ्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार आहे,असा मचकुर या सुसाईट नोटमध्ये लिहुन ठेवला आहे.आगारातून मिळालेल्या माहिती वरून पोलीस कर्मचारी विजय आडे, प्रकाश देशमुख यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला व सुसाईट नोट हस्तगत केली.

वीम्यासाठी सहकुटूंब आत्मदहनाचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या