कंधार : तालुक्यातिल व फुलवळ परिसरात जनावराच्या लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. करिता आपल्या जनावरांमध्ये आजार पसरू नये म्हणून जनावराचे गोठे निजंर्तुकीकरण करणे अत्यावश्यक आहे. तसेच हा आजार पसरवणा-्या बा परजिवी म्हणजे गोचीड, गोमाशा, चिलटे, डास ई. पासुन आपल्या पशुधनाचे रक्षण करावे.
करिता जनावरांच्या गोठ्यांची स्वच्छता करण्यासाठी गोठ्यांमध्ये रोज सायंकाळी कडूलिंबांच्या पाल्याचा धू करणे, गोठ्यामध्ये असणा-्या फटी/पऊळ असेल तर दोन्ही दगडातील सांधी इ. साठी गोठ्यांमध्ये काळजीपूर्वक मशाल टेंभा करून जाळून घेणे जेणेकरून गोचीड वा त्यांची अंडी जळून जातील. गोठ्यामध्ये १ लिटर पाणी, १० मिली करंज तेल, १० मिली कडूनिंब तेल, १० मि.ली. निलगिरी तेल, २ ग्रॅम अंगाच्या साबनाचे द्रावण व्यवस्थीत ढवळून फवारावे हेच द्रावण जनावरांच्या अंगावर सुद्धा फवारता येईल.
याशिवाय १ लिटर पाण्यामध्ये ५० मि.ली. निंबोळी अर्क टाकुण सुद्धा फवारणी करता येईल. तसेच जर जनावरांच्या अंगावर किंवा गोठ्यामध्ये किटकांची संख्या अमर्याद असल्यास तज्ञ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक किटकनाशकांची फवारणी करता येईल. कोणत्याही फवारणीपूर्वी पशुंना भरपूर पाणी पाजावे व जनावरांच्या अंगावरील फवारलेले औषध किंवा द्रावण संपूर्णपणे सुकेपर्यंत ते चाटू नये म्हणून तोंडास मुंगसे बांधावे.
सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व पत्रकार बांधव व सर्व पशुपालक बांधव आपल्या सर्वांच्या सहकायार्ने आपण आजपर्यंत जनावराच्या या अतिशय घातक असणा-्या लंपी त्वचारोगा पासुन आपल्या कार्यक्षेत्रातील अमुल्य अशा पशुधनाचे रक्षण केलेले आहे. याच प्रकारे येथून पुढेही हा आजार संपूर्णपणे जाईपर्यंत रक्षण करूया.
खात्री व अपेक्षेसह सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मधुसुदन रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.भूपेंद्र बोधनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.डी.एन. रामपुरे पशुधन विकास अधिकारी यांनी केले.