वाईबाजार : अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणा-या तस्करांविरूद्ध महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी सायंकाळी रात्रीच्या अंधारात कोळी सायफळ शिवारातील पैनगंगा नदीच्या पात्रात पथक प्रमुख परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नेतृत्वातील पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले.दरम्यान यातील एक ट्रॅक्टर तलाठ्यांनी नदीत पोहत जाऊन जप्त केले.
अवैधरित्या वाळू उपसा करणा-या तस्कराविरूद्ध जिल्हाधिका-यांनी स्वत: कारवाईंसाठी मैदानात उतरले आहेत.तर जिल्हयात ही महसुल विभागास कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. माहूर तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने गौण खनिज तस्करीला आळा घालण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान सायफळ व मदनापुरला लागून असलेल्या कोळी (बे.) शिवारात तीन सोनालीका ट्रॅक्टर त्याच्यातील दोन ट्रॅक्टर विना नंबरचे व एक एम.एच.२९.ए.के.२७८२ क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त केले. या पथकात मंडळ अधिकारी सुगावे, पदकोंडे, तलाठी विश्वास फड, भानुदास काळे, राजुरवार, तलाठी कांबळे, संदिप जाधव, कोठारे, तलाठी महिला तलाठी कुडमेथे यांचा समावेश आहे.
दरम्यान महसूल पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पैनगंगा नदी पात्रात धाड घातली असता वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पाण्याच्या आत टाकून वाळू भरणे सुरु होते. पथक नदीपात्रात आल्याचे पाहून ट्रॅक्टर चालक पळ काढण्याच्या बेतात होते. तेवढ्यात तलाठी विश्वास फड व कांबळे यांनी पाण्यात उड्या मारून ट्रॅक्टर चालकांना पकडण्यासाठी पोहून ट्रॅक्टरजवळ पोहचले पण तोपर्यंत ट्रॅक्टर चालक नदीपात्रातून पोहून रस्त्याच्या बाहेर निघाल्याने ट्रॅक्टर सोडून फरार होण्यात यशस्वी झाले होते. तलाठी यांनी ट्रॅक्टर सुरु करून पाण्याच्या बाहेर थडीला आणून ठेवले. माहूर तहसील कार्यालयातील तलाठ्यांच्या मदतीने परिविक्षाधीन तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केलेल्या वाळू चोरी करणा-यां तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
हदगांव तालुक्यात ऊसतोड कामगारावर प्राणघातक हल्ला