24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeनांदेडमहात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी

महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी

एकमत ऑनलाईन

कंधार : कंधार येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वी जयंती दिनांक १९ मे रोजी ढोल-ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या जयंतीमध्ये औरंगाबाद येथिल ढोलपथक व तुळजापुर येथिल हलगी पथक आकर्षक ठरले.

ही मिरवणूक माईचे मंदिर येथे नारळ फोडून या मिरणुकीची सुरवात करण्यात आली. गांधी चौक, सराफा लाईन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक ते बसस्थानक या मार्गाने ही मिरवणूक निघाली. ढोल व हलगीच्या तालावर हजारो तरुणांनी ढुमके लावत ताल धरला.

जागोजागी फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली. संत नामदेव महाराज मंगल कार्यालयात जयंतीचा समारोप करण्यात आला. या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे होते तर उदघाटक वैजनाथ तोनसुरे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य अ‍ॅड. विजय धोंडगे, विठ्ठल ताकबिडे, स्वागतध्यक्ष शहाजी नळगे, कार्याध्यक्ष बालाजी चुक्कलवाड,बालाप्रसाद मानसपुरे, शिवसेना माजी नगरसेवक गणेश कुंटेवार, मनोहर पा,भोसिकर,

बालाप्रसाद भोसिकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे, मामा मित्र मंडाळाचे अध्यक्ष मारोती गायकवाड, दिगबंर मांजरमकर साहित्यिक तथा गायक प्रा. माधव जाधव हे उपस्थित होते. जयंती साजरी व यशस्वी करण्यासाठी बालाप्रसाद मानसपुरे, शुभम घोडके, त्र्यंबक पा. भोसीकर, एजास शेख, शिवराज भोसीकर, बाबुराव फासमल्ले, डि.एन.मंगनाळे, प्रा.मंगनाळे आदिसह अनेकांनी परिश्रम घेतले. समारोप कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या