30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडकोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा केंद्रीय पथकाकडून आढावा

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा केंद्रीय पथकाकडून आढावा

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाला नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ग्राम पातळीपर्यत ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्याची केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. या पथकात पाँडेचरी येथील जवाहरलाल इस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडीकल एज्युकेशन अँड रिसर्च (जीपमर) चे कम्युनिटी हेल्थ विभागाचे प्रमूख डॉ. पलनिवेल सी सहभागी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन यंत्रणेमार्फत कोरोना उपाययोजनाबाबत जे नियोजन केले जात आहे, त्यांची प्रत्यक्ष भेट देवून हे पथक आढावा घेत आहे.

दि. ९ एप्रिल रोजी या पथकाने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेचा आयडीएसपी सेल येथे भेट देवून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांच्यासमवेत चर्चा करुन जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तालुक्याची संख्या, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तालुका पातळीवरील रुग्णालय, या सर्वामार्फत केले जाणारे उपचार, ऑनलाईन डाटा फिडींग प्रणाली याबाबी समजून घेतल्या. त्यानंतर विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आरटीपीसीआर लँब, कोविड केंअर सेंटर यांची पाहणी करुन माहिती घेतली. रुग्णांची अधिक संख्या असूनही उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात जिल्हा प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

या पथकाने लोहा तालुक्यातील कोविड केअर सेंटरला भेट देवून काही बाधितांशी चर्चा केली. याचबरोबर कारेगाव येथे भेट देवून गावातील परिस्थिती समजून घेतली. या गावात होम आयसोलेशन अर्थात गृहविलगीकरण अंतर्गत उपचार घेणा-या एका बाधिताची भेट घेवून चौकशी केली. गृहविलगीकरणाचे महत्व आणि यात डॉक्टराच्या निदेर्शाप्रमाणे औषधोपचार होत असल्याची खातरजमा त्यांनी करुन घेतली. जिल्हा आरोग्य विभागातर्फे मोबाईल टेस्टींग व्हॅन, लसीकरण आदीची माहिती त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे यांच्याकडून समजून घेतली.

हे पथक दिनांक ८ एप्रिल २०२१ पासून जिल्हा दौ-यावर आहे. ८ एप्रिल रोजी पथकाने नांदेड शहरातील जिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटर आदि ठिकाणी भेट देवून पाहणी केली. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्याकडून आढावा घेतला.

राजकारणाच्या किड्यावर औषध काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या