22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeनांदेडजी-२० परिषदेचे अध्यक्षपद हा भारताचा सन्मान : खा. चिखलीकर

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद हा भारताचा सन्मान : खा. चिखलीकर

एकमत ऑनलाईन

नांदेड : ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षा, आणि विश्वकल्याण या त्रिसूत्रीचा मंत्र देऊन जी-२० शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दिलेल्या बंधुत्वाच्या संदेशातून भारत जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेत बजावलेल्या भूमिकेचा भारतीय म्हणून आम्हास अभिमान वाटतो, अशा शब्दांत भाजपचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जी-२० शिखर परिषदेतील भूमिकेबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले.

आजचे जग सामुहिक नेतृत्वाकडे आशादायी नजरेने पाहत आहे. अशा परिस्थितीत जी-२० चे अध्यक्षपद भारताकडे आल्याने एक जग, एक ऊर्जा, एक सूर्य या पंतप्रधान मोदी यांच्या आग्रहास जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे, असे ते म्हणाले. जी-२० चे अध्यक्ष म्हणून भारताची, पर्यायाने पंतप्रधान मोदी यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. भारत एकीकडे विकसित देशांशी घनिष्ठ संबंध ठेवून आहे आणि सोबतच विकसनशील देशांचा दृष्टिकोन देखील योग्य प्रकारे समजून घेत आहे. याच आधारावर जी-२० अध्यक्षपदाची रूपरेखा जागतिक दक्षिण म्हणून ओळखल्या जाणा-या ग्लोबल साउथच्या देशांच्या सर्व मित्रांसोबत मिळून बनविण्याच्या पंतप्रधानांच्या भूमिकेचेही त्यांनी स्वागत केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या