28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडशेता वनात चट मंगणी ,पट व्यहची सध्या चलती!

शेता वनात चट मंगणी ,पट व्यहची सध्या चलती!

एकमत ऑनलाईन

देगलूर : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू करण्यात आलेल्या शासकीय निबंर्धांमुळे लग्नसराईची धामधूमिला ब्रेक लागला असून या काळात प्रामुख्याने ग्रामीण भागातील असे समारंभ काळया आईच्या साक्षीने म्हणजे शेता वनात अगदी सावधान राहून पार पडली जात आहेत. विवाह संस्कृती हे एक सामाजिक बंधन असून हा समारंभ खास करून एक हिंदुधमार्तील संस्कार मानला जातो अशा विवाह संस्कारामुळे दोन व्यक्तीचे नव्हे तर दोन कुटुंब आणि संबंधित सर्व नातेवाईक नात्याने घट्ट जोडले जाण्याचा एक धागा निर्माण होतो यालाच लग्नघाट म्हटले जाते.

अशा या आनंदाला उधाण आणणा-्या विवाह समारंभास थाटात आणि धामधुमीत साजरे करण्याची अपेक्षा वर-वधू व नातेवाईक या सर्वांचीच असते आणि ती स्वाभाविक आहे .परंतु गेल्या 13 महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने अशा उत्साहपूर्ण समारंभाचे बारा वाजवले असून त्यामुळे बोहल्यावर चढणार या इच्छुक युवक-युवतींचा आणि त्यांच्या मित्र परिवारांचा हिरमोड झाला आहे.

सध्या लग्नसराईची धामधूम सुरू असली तरी त्याला कोरुना पार्श्वभूमीवर बंधने आल्यामुळे असे समारंभ अगदी साधेपणाने होत आहेत त्यामुळे या समारंभांना चट मंगनी पट ब्याह असे नवे स्वरूप प्राप्त झाले आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात असे समारंभ काळ्याआईच्या साक्षीने पार पाडली जात असून या काळात सुखी संसाराची स्वप्न उराशी बाळगून गेल्या वर चढणार यांना मात्र आधी सगळी हाऊस विसरून काळ्याआईच्या सानिध्यातील काटेरी बांधावरून वाटचाल करावी लागल्याने कोणती दिवस येतील घे कैसे अशी एकंदर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

परभणी हातगाडे चालकांची जागेवरच आरटीपीसीआर तपासणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या