25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चव्हाण तर उपाध्यक्षपदी भोसीकर

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चव्हाण तर उपाध्यक्षपदी भोसीकर

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दारुन पराभव करीत महाविकास आघाडीने पालकमंत्री अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला आहे बँकेचे अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदासाठी चूरस लागली होती १६ एप्रिल रोजी विशेष घेण्यात आली यावेळी सवार्नुमते माजी आमदार वसंतराव चव्हाण तर उप अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दुपारी १२.३० वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येक एक एक अर्ज दाखल झाल्यामुळे २ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अमृत जाधव यांनी अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी हरीहरराव भोसीकर यांची विनवीरोध निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले.

नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक १२ जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडेच अध्यक्षपद जाण्याचे संकेत प्राप्त झाले राष्ट्रवादी काँग्रेस पाटीर्चे चार उमेदवार निवडून आल्यामुळे राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद जाणार असल्याचे भाकित केल्या जात होते. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे समर्थ सहकारी पॅनलने जिल्हा बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागांवर वर्चस्व निर्माण करुन बँक ताब्यात घेतली आहे. त्यामध्ये कॉंग्रेसचे १२ तर शिवसेनेचा १, राष्ट्रवादीचे ४ असे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे केवळ ४ उमेदवार निवडून आले आहेत .

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यापासून बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार असे राजकीय वतुर्ळात चचेर्ले जात होते. शुक्रवारी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित सदस्य ची विशेष सभा घेण्यात आली या वैठकिस महावीकास आघाडीचे जवळपास १७ सदस्य उपस्थित होते दुपारी १२.३० वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली अध्यक्ष पदासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला तर अप अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोसीकर याचं एक अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी संमृत जाधव यांनी दुपारी दोन वाजता अध्यक्ष पदी वसंतराव चव्हाण तर उप अध्यक्ष पदी हरीहरराव भोसीकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असुन लातुर येथिल डि डि आर अमृत जाधव , नांदेड येथील अनिल चव्हाण, कर्मचारी कार्ले, भिसे यांनी सहकार्य केले. अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठाची घोषणा झाल्यानंतर महावीकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

जिल्हा बँकेला राज्य शासनाचे सहकार्य राहील : ना.चव्हाण
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्ष पदी हरीहरराव भोसीकर यांची निवड झाली. यानंतर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बँकेच्या संचालकांशी संवाद साधताना बँक चांगलीच चालली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर जिल्हा बँकेला राज्य सरकारचे वेळोवेळी सहकार्य राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी संचालक मंडळास दिले. यापुर्वी हीच बँक वाचविण्यासाठी १00 कोटीचे अनुदान दिले होते. त्यामुळे बँक ऑक्सिजनवर का होईना आजतगायत चालली आहे. यापुढे बँकेला चांगले दिवस येथील असे त्यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेचा ‘कणा’ अडचणीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या