27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeनांदेडस्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अर्धापुरात धरणे आंदोलन!

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अर्धापुरात धरणे आंदोलन!

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतिने स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी अर्धापूर तहसिल कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन प्रधान सचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्या मार्फत सोमवारी देण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र धान्य वाटपाचे काम केले. त्यामुळे देशात एकही नागरिक भूकबळी झाला नाही. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाव्दारे गठीत केलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम अंतर्गत त्यांच्या विपोर्टवर ४४० रू. कमीशन प्रति क्विंटल देण्यात यावे. अशी शिफारस करण्यात आली. त्याची सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. दरमहा ५० हजार रूपये निश्चित मानधन घोषित करण्यात यावे. केंद्र सरकारने वाढविलेले २० व ३७ रूपये कमिशनची रक्कम राज्य सरकारने तात्काळ अंमलात आणावी. यासह विविध मागण्यासाठी अर्धापूर तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील क्षिरसागर, उपाध्यक्ष बाबुराव राजेगोरे, शहराध्यक्ष शेख शकील, बाबाराव सरोदे, राजा यल्लपा कोळी, आमेर सिद्दीकी, संभाजी जाधव, नुरखाँ पठाण, गौतम सावते, सोनाजी सरोदे, माणिका साखरे, अशोक कांबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या