34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडइंटरनेट अभावी स्वस्तधान्य दुकानदाराची रानमाळात भटकंती

इंटरनेट अभावी स्वस्तधान्य दुकानदाराची रानमाळात भटकंती

एकमत ऑनलाईन

शिवणी (प्रकाश कार्लेवाड) : किनवट तालुक्यातील शिवणी हे गाव तेलंगाणा सीमेवरचे मोठे बाजार पेठ मानले जाते पण या बाजार पेठेला इंटरनेट अभावी खीळ बसताना दिसून येत आहे.कदाचित भारतातील एक मेव शिवणी गाव असेल जिथे मोठे बाजार पेठ असून सुद्धा इंटरनेट व नेटवर्क ची सुविधा शून्यात जमा आहे.तर शिवणी परिसरातील काही गावांना अद्याप टावरच नाही. यात दयालधानोरा,गोंडजेवली ,पांगरपहाड , आंदबोरी (ई), झळकवाडी,तल्हारी,मारलागुंडा, हे सर्व गावे तालुक्यातील अति दुर्गम भागातील गावे असून या भागात नागरिकांना फक्त फोन लावण्यासाठी दहा-दहा किलोमीटर भटकंती करावे लागते.तर इंटरनेट अभावी स्वस्त धान्य दुकानदार, ऑनलाइन सर्व्हिस सेंटरचे परिचालक, विद्यार्थी सह व्यापारी रानमाळात आपली यंत्रने व मोबाइल घेऊन दिसत आहेत

किनवट तालुक्यातील शिवणी सह परिसरातील १८ वाड्या-तांड्यातील हजारो नागरिक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असून नागरिकांना नेटवर्क (सरचिंग) शोधत रानोमाळ व शेता-शेतात फिरावे लागत आहे.मागील अनेक वर्षांपासून या अतिदुर्गम भागात नेटवर्क नसल्याने या भागातील नागरिकांना दैनंदिनी जीवन जगण्यास त्रास भोगावा लागत आहे.तरी या भागाकडे लोकप्रतिनिधी ने सर्रास पाठ फिरवल्याने या परिसरातिल सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी व्यापा-्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.निवडणुका आल्या की नेते मंडळी मतदान मागण्यासाठी गावोगावी फिरत असतात पण निवडणुका संपल्या की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मात्र कोणीच येत नसतात हे दुर्दैव म्हणावे लागेल असा सूर जनतेतून निघत असून अनेक वेळा नेटवर्क व इंटरनेट संबधी विविध दैनिकात बातम्या ही प्रसारित झाल्या पण या कडे वेळोवेळी सर्रास दुर्लक्ष करण्यात आले.

तर शिवणी परिसरातील शिवणी, दयाल धानोरा,द.धा.तांडा, गोंडजेवली व्यंकटापुर, मलकजाम,म.जाम तांडा,दत्तनगर,कंचली, पांगरपहाड,आंदबोरी ई,तोटंबा,मानसिंग नाईक तांडा,मारलागुंडा,गोंडेमहागाव, झळकवाडी,तल्हारी,तल्हारी तांडा,सेवादास तांडा,सह अनेक ठिकाणी नेटवर्क व इंटरनेट येत नसल्यामुळे या सर्व गावातील जनतेला स्वस्त धान्य मिळवण्यासाठी ऑनलाईन आधार प्रमाणित करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार व स्वस्त धान्य पुस्तिका धारकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्क साठी तेलंगणा सीमेवर जावे लागत आहे.तर अनेक वेळा उंच डोंगर माळावर नेटवर्क शोधावे लागत आहे.

व्होडाफोन, बी.एस.एन.एल व आयडिया या नेटवर्क कंपन्यांकडून जनतेची सर्रास आर्थिक लूट होत आहे.या कंपन्याकडून सेवा मात्र शून्य आहे. ह्याचे कारण मोबाईल रिचार्ज पॅक मारून ही त्याचा फायदा शिवणी भागातील जनतेला एक टक्के सुद्धा होत नसल्याने शिवणी भागातील नागरिक त्रस्त झाले आहे.तर ऑनलाईन पेमेंट व ऑनलाईन फॉर्म भरणारे कॅम्पुटर परिचालक आपली दुकाने राना-माळात शेतात थाटले असून ऑनलाईन बँकिंक कामासाठी शेताशेताने फिरावे लागते आहे.तर सरकार मान्य सेतू सुविधा केंद्रावर इंटरनेट अभावी कोणी ग्राहक जातच नाही.ऑनलाईन च्या छोट्या कामासाठी व शेतक-्यांना व्यापा-यांना व विद्यार्थ्यांना किनवट किंवा ईस्लापुर गाठावे लागत आहे.करीता आयडिया, व्होडाफोन,बी.एस.एन.एल कंपन्यांनी 4 जी नेटवर्क करावा अशी मागणी होत आहे.

विष्णुपुरीत तीन दुकाने चोरट्यांनी फोडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या