25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeनांदेडमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला पुरस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला पुरस्थितीचा आढावा

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यासह परीसरात पावसाने हाहाकार माजवला असून शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातून वाहणा-या असना नदीला पुर आला असून, या पुरात अनेक ठिकाणी नागरिक अडकल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी फोनवरून हिंगोली आणि नांदेडच्या जिल्हाधिका-यांशी संपर्क साधून येथील पुर परीस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा येथे निर्माण झालेल्या पुरपरीस्थितीचा आढावा घेतला़ तसेच नांदेड जिल्ह्यातही अर्धापुर तालूक्यातील काही गावांचा पुरामुळे संपर्क तुटला असून या ठिकाणच्या सर्व नागरिकांना रेस्क्यू करा, त्यासोबत त्यांचे जेवन, पाणी, राहण्याची सोय करा, पुरपरीस्थितीमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा, तसेच जिल्ह्यातील पुरपरीस्थितीवर लक्ष ठेवा अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिका-यांना फोनवरून दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या