23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडमुख्यमंत्र्यांचे शेतक-यांप्रती पुतनामावशीचे प्रेम

मुख्यमंत्र्यांचे शेतक-यांप्रती पुतनामावशीचे प्रेम

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला मिळाला असताना शेतक-यांचे अश्रू पुसण्याऐवजी आपल्यासोबत आलेल्या गद्दार आमदारांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिला. शेतक-यांप्रती मुख्यमंत्र्यांनी दाखविलेले प्रेम हे पुतनामावशीचे प्रेम आहे. मुख्यमंत्र्यांना शेतक-यांच्या दु:खाशी काही देणे-घेणे नाही. त्यामुळे विधान परिषदेत शेतक-यांच्या वेदनांचा आवाज बुलंद करून अतिवृष्टीग्रस्तांना न्याय मिळवून देऊ, असे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे व्यक्त केले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज नांदेड जिल्हा दौ-यावर आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेचे नेते राजू वैद्य, बौडचे संपर्कप्रमुख धोंडूदादा पाटील, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोज भंडारी, प्रकाश मारावार, जिल्हा संघटक दयाल गिरी, निखील लातूरकर, माजी नगरसेवक आनंद जाधव, बाळासाहेब देशमुख, महेश खेडकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख गजानन कदम, युवासेना महानगरप्रमुख नवज्योत गाडीवाले, बाबुराव वाघ, वत्सला पुयड, डॉ. निकिता चव्हाण, राम चव्हाण, बालाजी पेनूरकर, नवनाथ जोगदंड, सुनील कदम, बाळासाहेब निळेकर, रमेश कोकाटे, निळकंठमामा नांदुसेकर, पुरभाजी पासदगावकर, अरुण गारोळे, बालाजी पिंपळगावकर, संतोष कल्याणकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निळा, पासदगाव, नांदुसा, पिंपळगाव आणि मेंढला येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधला. आपल्याला अधिकची भरपाई मिळवून देण्यासाठी विधान परिषदेत आपला आवाज बुलंद करू. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या मनात कोणताही वाईट विचार आणू नका. पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर आहे असा विश्वास दानवे यांनी यावेळी शेतक-यांना दिला. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधतांना दानवे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतरही दोन सदस्यीय सरकार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी तयार नव्हते. यातील एक सदस्य तर कोणत्याही खात्याचा प्रमुख नव्हता. सर्व काही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच होते; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांना सावरण्याऐवजी शिवसेनेत गद्दारी करणा-या आमदारांचे चोचले पुरविण्याचे काम केले. नांदेड दौ-यातही तेच झाले आहे. मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार घेण्यासाठी वेळ मिळाला; मात्र शेतक-यांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, हे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यानंतरही आम्हीच शेतक-यांचे हितचिंतक आहोत असे सांगणा-या मुख्यमंत्री यांचे शेतक-यांवरील प्रेम है पुतनामावशीचे प्रेम आहे असा पुनरुच्चारही दानवे यांनी केला. यापुढे शेतक-यांच्या मागण्यांसाठी शिवसेना रस्त्यावरची लढाई लढेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

तडीपारच्या नोटिसांची होळी करा
शिवसैनिकांचा आवाज दाबण्यासाठी बंडखोर आणि गद्दारांच्या सरकारकडून पोलिसी बळाचा दुरूपयोग केला जात आहे. केंद्रात भाजपा सरकार ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणेचा दुरूपयोग करीत आहे, तोच प्रकार आता महाराष्ट्रातघडत आहे; परंतु शिवसैनिक अशा गोष्टींना भीक घालत नाही. त्यामुळे ज्या शिवसैनिकांना तडीपारच्या नोटिसा आल्या असतील त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही तर नोटिसांची भरचौकात होळी करा. त्यानंतर होईल ते बघून ७ घेऊ, असा इशारा दानवे यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या