34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeनांदेडचिखलीकर पिता -पुत्राचे निवडणुकीसाठी अर्ज दाखल

चिखलीकर पिता -पुत्राचे निवडणुकीसाठी अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदार यादीतील नाव कायम ठेवत निवडणूकीच्या सर्व प्रक्रियेत सहभागी होता येईल असा निर्णय देत सर्वाेच्च न्यायालयाने खा.प्रताप पा.चिखलीकर यांना तूर्त दिलासा दिला आहे.मंगळवारी सकाळी मा.न्यायालयाचा निर्णय येताच खा.चिखलीकर यांच्यासह पुत्र प्रविण पा.चिखलीकर यांनीही तातडीने जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बंकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापासूनच या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप व कॉंग्रेसमध्ये छुपे राजकारण सुरु झाले आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी जाहिर करण्यात आलेल्या मतदार यादीत भाजपचे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचे जानापुरी येथील सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून नाव समाविष्ट होते. परंतु प्रतिनिधी म्हणून घेण्यात आलेला हा ठराव सहकारी संस्थाच्या कायद्यानुसार नाही असा अक्षेप घेत विभागीय सह निबंधक लातूर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. यावरुन विभागीय सहनिबंधक यांनी मतदारयादीतील खा. चिखलीकरांचे नाव रद्द करण्याचा निर्णय दिला होता.

याविरुद्ध औरंगाबाद उच्च न्यायालयात खा. चिखलीकर यांनी दाद मागीतली होती. येथे उच्च न्यायालयाने खा. चिखलीकरांचे नाव मतदारयादीत कायम ठेवण्याचा निर्णय दिला तेव्हा पुन्हा काही मंडळीने या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात आज मंगळवारी सकाळी सुनावणी होवून उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला यामुळे खा. चिखलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मा. न्यायालयाचा हा निर्णय येताच खा. चिखलीकर यांनी मंगळवारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत पुत्र प्रविण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बँकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व भाजपात राजकीय लढाई सुरु झाल्यामुळे होणा-या निवडणुकीत रंगत येणार आहे.

विरोधकांना चपराक : खा.चिखलीकर
जानापुरी येथील गावक-यांना संस्थेचा प्रतिनिधी म्हणून बँकेसाठी ठराव दिला मात्र याचा राजकीय वजन वापरत काही मंडळीनीं फायदा घेतला.उच्च न्यायालयाने यात सर्व बाजू एैकून हा ठराव योग्य असल्याचा निर्णय दिला.मा.सर्वांेच्च न्यायालयानेही या निर्णयास स्थगिती देण्यास नकार देत निवडणूकीच्या सर्व प्रकियेत सहभागी होण्याचा निर्वाळा दिला आहे. ही न्यायालयात जाणा-या विरोधकांना चपराक आहे. बँके ची निवडणूक सर्वांना सोबत घेऊन लढविण्यात येईल.तसेच मागच्या वेळी जे पदाधिकारी सोबत होते.त्यांच्याशी बोलणे सुरू असल्याचे खा.प्रताप पा.चिखलीकर यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.

ई- कच-याचेही होणार रिसायकलिंग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या