22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडविद्युत तारेच्या कुंपणाला स्पर्श होऊन बालकाचा मृत्यू

विद्युत तारेच्या कुंपणाला स्पर्श होऊन बालकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मांडवी : किनवट तालुक्यातील वझरा बु येथील एका शेतक-्याच्या शेताभवती विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या कुंपणाला दहा वर्षांच्या बालकाचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दि.२८ एप्रिल रोजी वझरा बु येथील आदित्य किशन गेडाम वय १० वर्ष व त्याचे तीन मित्र एका शेतात गेले असता शेतमालक नारायण रामलू माधावार वय ५० वर्ष याने आपल्या शेतात जंगली जनावरे येऊनय म्हणून तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडले होते त्या तारेच्या कुंपणाला आदित्य किशन गेडाम याचा स्पर्श झाल्याने आदित्यचा मृत्यू झाला व इतर तीन मुले जखमी झाले.

या प्रकरणी मयताचे वडील किशन भीमराव गेडाम वय ४५ वर्ष रा वझरा (बु )यांनी मांडवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी नारायण रामलू माधावार वय ५० वर्ष रा वझरा (बु) व त्याचा मुलगा भीमणा नारायण माधावार वय२३ वर्ष रा वझरा (बु) हे विद्युत प्रवाहामुळे एखादी व्यक्तीची जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे माहीत असून सुद्धा तसे कृत्य करून एका लहान मुलाचे मारणास कारणीभूत झाल्यामुळे मांडवी पोलीस ठाण्यात कलम ३०४,३३७भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे पुढील तपास सपोनि मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी जमखान पठाण करीत हे आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी शेतक-यांनी लावलेल्या तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. मात्र विद्युत प्रवाह बंद करण्याचा विसर संबंधीत शेतक-याला पडल्यामुळे सदर अपघात घडला असल्याचे समजते.

एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात
शेतातील पिकांचे नुकसान होऊन म्हणून जगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी तारेचे कुंपण बांधुन त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडला होता बुधवारी एका चांगल्या वर्षीय बालक आपल्या मित्रांना सोबत घेऊन शेतात गेले असता विधुत तारांना सर्प झाल्यामुळे त्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला तर यात अन्य दोन जण जखमी झाले आहेत या प्रकरणी संबंधित शेतक-्याच्या निष्काळजीपणा मुळे सदर बालकास जीव गमवावा लागला दिलेल्या फियार्दीवरून मांडवी पोलिस ठाण्यात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका जणास ताब्यात घेतले आहे.

परकीय मदतीबाबतच्या धोरणात बदल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या