22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeनांदेडगॅसच्या भडक्यात बालकाचा मृत्यू

गॅसच्या भडक्यात बालकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : घरातील गॅसवर चहा करत असताना अचानक गॅसचा भडका झाल्याने एका १६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील डॉ. आंबेडकरनगर भागात घडली. या दुर्दैैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आंबेडकरनगर भागात राहणार १६ वर्षीय शेखर राष्ट्रपाल दवणे हा दि. ३१ जुलै रोजी साडेचारच्या सुमारास घरातील गॅसवर चहा बनवत होता. यावेळी अचानक गॅसचा भडका उडाल्याने तो गंभीररित्या भाजला होता. उपचारासाठी त्यास विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी विशाल रमेश दवणे यांच्या माहितीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या