देगलूर : मातांच्या सहभागाशिवाय मुलांचे शिक्षण पूर्ण होणे अशक्य आहे, संगोपन करणारी आई ही आपल्या मुलाला तरबेज करते असे प्रतिपादन निपुण भारत मिशन उपक्रमाचे लातूर विभागाचे विभागीय सदस्य विश्वनाथ आरोटले यांनी केले.
निपुण भारत अंतर्गत आय.एस.ओ. मानांकन प्राप्त जि. प. प्रा. शाळा सांगवी उमर केंद्र नरंगल ता.देगलूर येथे मातापालक सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेबोलत होते.
शंकर कुद्रे यांनी ९ व्या व १० व्या आठवड्यातील निपुण भारतचे आयडिया व्हीडीओ दाखवून त्यावर चर्चा व मार्गदर्शन केले. मुलांच्या शिक्षणासाठी मातांनी आपला स्वत: चा उढऊ माता पालक सभेतून कसा वाढवावा याबाबत सांगितले. यावेळी मातापालक उपस्थित होते. यासभेचे अध्यक्ष नरंगल केंद्राचे केंद्रप्रमुख राजेश्वर किशवे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देगलूरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर नरंगल बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी डी. के.तोटरे उपस्थित होते यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रामराव पांचाळ, शंकर कुद्रे शा. व्य.समिती अध्यक्ष दादाराव कांबळे , उपाध्यक्ष धनाजी पाटील,भगवान बाळके, मिलिंद वाघमारे, भीमाशंकर बच्चेवार आदींनी परिश्रम घेतले.