23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडनागाच्या दंशाने चिमुकलीचा मृत्यू

नागाच्या दंशाने चिमुकलीचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

माहूर : तालुक्यातील वानोळ्यापासुन जवळच असलेल्या साकुर येथे मोग-याची
फुले तोडण्यासाठी गेलेल्या ४ वर्षीय कु.संस्कृती अर्जून लांबाटे या बालिकेच्या पायाला शुक्रवार दि.२४ रोजी दुपारी नागाने दंश केला आणि अवघ्या एका तासाचे आतच उपचारासाठी जात असताना बालिकेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला.

विशेष म्हणजे दुपारी एक वाजता घरी वडील अर्जुन प्रसराम लांबाटे सोबत जेवण करिता असताना अचानक कु. संस्कृती मोग-याची फुले तोडण्यासाठी बागडत गेली. आई-वडीला सह आजिने थांबण्यास सांगुन ही ईवलुशी बालिका मोग-याच्या फुलांच्या मोहा पायी घराच्या बाजुला च असणा-या झाडाकडे पळत गेली. आणि झाडावरिल फुले तोडण्यात दंग असणा-या बालीलीकेला झाडाच्या बुंध्याजवळ असणा-या बिळात काळ बसुन असल्याचा भनकही न लागण्याच्या आतच अंगठ्याचा लचका घेतला.

रक्ताबंबाळ अवस्थेत घरी आली. वडील अर्जुन लांबाटे व परिवार जन अंगठ्यातुन निघणा-या रक्ताची पास पुस करिता असतानाच बालीका गुंगी व मळमळणे होत असल्याचे म्हणाल्या ने सर्प चालल्याचे प्रसंगावधान लक्षात येताच पिता अर्जुन लांबाटे यांनी तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेन्यांचा प्रयत्न केला. परन्तु
काही अंतर जाताच बालीकेने रस्त्यातच प्राण सोडला. चार वर्षीय बालीकेचा सर्प दंशाने तिच्या जिवनाची कली उमलन्या आधीच अंत झाल्याने गावा सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या