22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडसिटी स्कॅनचा स्कोअर २५ तरीही आजोबांची कोरोनाना हरवले

सिटी स्कॅनचा स्कोअर २५ तरीही आजोबांची कोरोनाना हरवले

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोनाच्या महामारीने धडधाकट माणसांच्या मनात धडकी भरवली आहे.परंतू लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील ६५ वर्षीय आजोबांनी सिटी स्कॅनचा स्कोर २५ असताना देखील कोरोनाला हरवले आहे.जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी स्वत: जिल्हा रूग्णालयास भेट देऊन आजोबांना निरोप देत डॉक्टरांच्या टिमचे कौतुक केले.

लोहा तालुक्यातील जोमेगाव या लहानशा गावातील सुमारे ६५ वर्षार्चे कोंडजी शिंदे हे शेतकर शेतीच्या कामात स्वत:ला दिवसभर झोकून द्यायचे असा त्यांचा दिनक्रम आहे. पंधरा दिवसापूर्वी त्यांना त्रास व्हायला लागला. तपासण्या झाल्या. सिटी स्कॅनचा स्कोअर थेट पंचवीस आला.तेव्हा जवळच्या नातलगांनी त्यांना नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. एक आव्हान म्हणून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने कोंडजी यांच्यावर उपचार सुरु केले. श्वास घ्यायला कोंडजी यांना त्रास होत होता. हळूहळू काही दिवसांत तो त्रास कमी झाला.

डॉक्टर जे काही सांगतात. ते श्रध्दा ठेवनू ऐकायचे आणि कोणतेही प्रश्न न विचारता दिलेल्या गोळया घ्यायच्या. या कोंडजी यांच्या स्वभावामूळे उपचार करणा-या टीमलाही त्यांचे विशेष अप्रुप झाले होते. दोन दिवसापूर्वीच कोंडजी यांचे ऑक्सीजन काढले. तेव्हा कोंडजी हे आता मला घरी जावू द्या म्हणून डॉक्टराच्या मागे लागले. डॉक्टरांनी त्यांना बळजबरी दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून सर्व खातरजमा झाल्यानंतर आज ‍रुग्णालयातून सूट्टी देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयातील ही सर्वोच्च सिटी स्कॅनची स्कोअर असलेली केस यशस्वी झाल्याने, इतर रुग्णांचे आणि वैद्यकीय टीमचे मनोबल वाढावे, त्यांच्या अथक प्रयत्नांना शाबासकी द्यावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांची भेट घेऊन कोंडजी यांना रुग्णालयातून शुभेच्छासह निरोप दिला.

यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालक अधिकारी तथा विभागीय उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे आदी जण उपस्थित होते.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या