29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडलॉकडाऊनच्या धास्तीमुळे नागरिक चिंतेत

लॉकडाऊनच्या धास्तीमुळे नागरिक चिंतेत

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात सध्या वाढत्या कोरोनामुळे नागरिक चिंतेत असताना आता नागरिकानी पुन्हा लॉकडाऊन लागणार या धास्तीने आज सोमवारी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. गेल्या वर्षी जसा एप्रिल महिन्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता, तसाच यंदाही १४ एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीचे राज्य सरकार आहे. याबाबत नुकतीच राज्य सरकारची बैठक संपन्न झाली.

या बैठकीत राज्यात लॉकडाऊन लागणार हे जवळपास आता निश्चित मानल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड शहरात विकेंड लॉकडाऊनचा शनिवार आणि रविवार झाल्यानंतर नागरिकांनी नांदेडच्या बाजारपेठेत सोमवारी मोठी गर्दी केली. पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य नागरिक खरेदी करताना दिसून आले.

कदाचित पंधरा दिवसाचा लॉकडाऊन लागला तर पुन्हा खरेदी करताना अडचणी येऊ नये म्हणून नांदेडकरांनी किराणा दुकान, भाजीपाला, मेडिकल आदी ठिकाणी मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी नागरिकानी सोशल डिस्टन्सिंग , मास्क न वापरता बाजारपेठेत सर्रास फिरताना दिसून येत होते.

आगामी सण उत्सवावर परिणाम
अवघ्या ऐका दिवसावर आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची खरेदी नागरीकांना करता येणार नाही. तर गुढी पाडवानिमित्ताने सोने खरेदी केली जाते मात्र यंदाही कोरोनाचे सावट असल्याने नागरिकांना सोने खरेदी करता येणार नाही.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी वापरास मुभा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या