30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडसंचारबंदीला न जुमानता नागरीक रस्त्यावर; बेशिस्त वागणुकीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका

संचारबंदीला न जुमानता नागरीक रस्त्यावर; बेशिस्त वागणुकीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासुन १ मे च्या सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात कडक संचारबंदी लागु केली असुन, यानुसार विनाकारण नागरीकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र महत्वाचे काम नसतानाही नागरीक अगदी बेफीकीरीने रस्त्यावर फिरताना दिसुन येत आहेत.

जिल्ह्यात मागच्या पंधरादिवसापासुन कोरोनाच्या रूग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दररोज सरासरी दीड हजार च्या आसपास नव्या रूग्णांची भर पडत आहे तर एका दिवसात सरासरी २५ वर रू ग्णांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयासह खासगी रूग्णालय देखील कोरोनाच्या रूग्णांणी भरून गेली आहेत. नव्या बाधित रूग्णांना अ‍ॅडमीट करण्यासाठी बेड मिळणेही अवघड बनले आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढले असले तरी त्यापेक्षा अधिक पट्टीने रू ग्ण संख्या वाढत आहे.

अशा गंभीर परीस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने नागरीकांना काही नियम घालुन दिले, मात्र त्या नियमांचे कुठेही पालन होताना दिसत नाही. शहरात काही हवशे, नवशे मास्क न घालता सर्रास पणे मोकाट फिरताना दिसत आहेत. त्यांना कुनीही बाहेर का फिरत आहात अशी विचारणा करत नाहीय. यामुळे कडक निर्बंध लागु करून फायदा तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. आशा बेशीस्त लोकांमुळेच कोरानाचा संसर्ग वेगाने पसरत आहे, त्यामुळे वेळीच आशा लोकांवर कारवाई करून यांचा बंदोबस्त करणे आता गरजेच बनले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील अध्यापक आणि वैद्यकीय अधिका-यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या