22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeनांदेडनांदेडच्या जांभळा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस

नांदेडच्या जांभळा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस

एकमत ऑनलाईन

तामसा(नांदेड) : जांभळा (ता. हदगाव) परिसरात शनिवार दि. २५ जून रोजी दुपारी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.

पावसामुळे परिसरातील नदी नाले भरभरून वाहून अनेक शेतातील पेरलेली सोयाबीन बियाणे पुराच्या तडाख्यात वाहून गेल्याची भीती शेतक-यांमध्ये व्यक्त होत आहे. या परिसरातील नदी-नाले तामसा नदीला मिसळत असल्याने जांभळा परिसरात पाऊस तर तामसा नदीला पूर असे चित्र संध्याकाळी बघायला मिळाले. पावसामुळे जांभळा गावाच्या पुलावरून तीन ते चार फूट पुराचे पाणी वाहल्याने पैलतीराकडील डाक्याचीवाडी, शेंदन, या गावाकडे जाणा-या संपर्क दोन तास तुटला होता. परिणामी तामसा येथील आठवडी बाजारातून खरेदी करून या परिसरात जाणा-या नागरिकांची मोठी परेशानी वाहतूक खोळंबल्याने बघायला मिळाले. या ढगफुटी सदृश पावसामुळे पुराचे पाणी अनेक शेतात घुसून शेत जमीन खरडन्याचा फटका अनेक शेतक-यांना बसणार आहे.

जिंतूर परिसरात ढगफुटी?
परभणी : जिंतूर तालुक्यातील वडी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. आ. मेघना बोर्डीकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना दिलासा दिला. दरम्यान परिसरातील वाघी (धानोरा), घागरा, बेलोरा आदी भागाला पावसाने झोडपून काढले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या