29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeनांदेडमुख्यमंत्री साहेब सांगा दारू महत्त्वाची की शाळा?

मुख्यमंत्री साहेब सांगा दारू महत्त्वाची की शाळा?

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
राज्यात कोरोनाने पुन्हा थेैमान घातले असून नव्या व्हेरीएंट ओमिक्रॉनचेही यात भर पडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागु करण्यात आले असून, १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवसण्याचा निर्णय राज्य सकारने घेतला आहे. याला विरोध करित एका चिमुकल्या विद्यार्थ्यांने मुख्यमंत्री साहेब सांगा दारू महत्वाची की शाळा? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.यासंदर्भातील एक व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत
आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिस-या लाटेला सुरूवात झाली आहे. दिवसभरात एकट्या नांदेड जिल्ह्यात चार ते साडे चारशे कोरोनाच्या रूग्णांची भर पडत आहे. आठवडाभरापुर्वी हिच रूग्णसंख्या केवळ दोन ते चार वर होती. मात्र अचानक वाढलेल्या रूग्णसंख्येने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत. त्यात पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तर रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली आहे. या दरम्यान जिल्ह्यात लग्नसमारंभ, राजकीय, धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्यात आले असुन या कार्यक्रमांना केवळ ५० व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर बार, रेस्टॉरंट, मॉल, चित्रपटगृह, उपहारगृह, मार्केट कॉम्प्लेक्स, खासगी अस्थापना आदींना ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यादरम्यान शाळा,महाविद्यायल बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांतही संताप व्यक्त केला जात आहे.

नांदेड येथील एका पाचवीत शिकणा-या चिमुकल्यांचा असाच एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. सचिन माळवटकर असे या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे नाव असुन, त्याने या व्हीडीओत चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाळा बंद केल्याने सवाल के ला आहे. तो या व्हीडीओत म्हणतो की, मुख्यमंत्री साहेब दारूची दुकान महत्वाची की शाळा, कारण कोरोना काळातही शासनाने दारूची दुकाने, चित्रपटगृह, मॉल्स, बार, रेस्टॉरंटंना ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली, मग या प्रमाणे शाळा सुरू ठेवण्यास परवानगी का नाही. शाळा सुरू ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे, म्हणून मुख्यमंत्री साहेब शाळा सुरू करा आशी विनंती या चिमुकल्याने सदर व्हीडीओद्वारे केली आहे. सद्याला या चिमुकल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला असुन, या विद्यार्थ्याची मागणी अगदी रास्त असल्याच्या प्रतिक्रीया नागरीकांतुन उमटत
आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या