32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeनांदेडलिंबोटी प्रकल्पास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची भेट

लिंबोटी प्रकल्पास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची भेट

एकमत ऑनलाईन

माळाकोळी : नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी रविवारी लिंबोटी प्रकल्पास भेट देऊन मत्स्यव्यवसाय प्रकल्पाची पाहणी केली.यावेळी लिंबोटी प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली.यावेळी जिल्हाधिकारी यांनी चिरंजीव आर्यन सोबत बोंटिगचा आनंद घेतला.

यावेळी आमदार शामसुंदर शिंदे , महापालिका आयुक्त सुनील लहाने , जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील,तहसीलदार विठ्ठल परळीकर, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त बादावार ,मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी सुरज कोल्हे उपस्थित होते.
यानंतर सदर मत्स्यव्यवसाय प्रकल्पाची जिल्हाधिकारी डॉ.विपीन म्हणाले , मराठवाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेला पिंजरा पद्धतीचा मत्स्यव्यवसायाचा हा पहिलाच प्रकल्प आहे . या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे, शिवाय चांगले उत्पादनही मिळत आहे.

असा प्रकल्प जिल्ह्यात अन्य ठिकाणी उभारण्यासाठी प्रयत्न केले जावेत त्यासाठी आपण निश्चितपणे मदत करू. लिंबोटी धरण परिसरात या व्यवसाया शिवाय पर्यटनाच्यादृष्टीने विकास केला तर त्यातूनही अनेकांना रोजगार मिळू शकतो असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिका-यांसह त्यांचे चिरंजीव आर्यन व इतर सर्व अधिका-यांनी लिंबोटी धरणात बोटिंगचा आनंद घेतला.

शिवाय यावेळी आमदार शामसुंदर शिंदे यांनी माळेगाव तीर्थक्षेत्र विकास कामास गती देणे, लिंबोटी येथील रस्ता व परिसरातील इतर गावांच्या विकास कामांच्या संदर्भात जिल्हाधिका-यांशी चर्चा केली. यावेळी माजी सरपंच केरबा धुळगुंडे ,उपसरपंच पंडितराव वारकड, चोंडी चे सरपंच श्री जाधव ,चंद्रकांत गोकुंडे, संदीप साखरे , लिंबोटी चे उपसरपंच कालिदास डोईफोडे, केशवराव सुरनर, केशव धुळगुंडे ,भानुदास पाटील ,उत्तमराव मंगरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या