23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeनांदेडकेंद्राकडून आ. कल्याणकरांच्या घराला सीआरपीएफची सुरक्षा

केंद्राकडून आ. कल्याणकरांच्या घराला सीआरपीएफची सुरक्षा

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यातील आक्रमक परिस्थिती पाहता केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घरासह कार्यालयास सीआरपीएफचे सुरक्षा कवच दिले आहे. शनिवारी संतप्त शिवसैनिकांचा आ़ कल्याणकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता.

राज्यभरात शिवसेनेतील बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले ही होत आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी केंद्रातील भाजप सरकार मोठे पाऊल उचलले आहे. बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना आता केंद्र सरकारने सुरक्षा देण्याचा निर्णय घेत तात्काळ ही सुरक्षा तैनातही केली आहे.

नांदेड उत्तरचे शिवसेनेचे बंडखोर आ. बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोर शनिवारी शिवसेनेच्यावतीने अंत्ययावा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले. यानंतर त्यांचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र नांदेड पोलिसांनी वेळीच बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना संपर्क कार्यालय फोडता आले नाही. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानूसार आ. बालाजी कल्याणकर यांचे घरासह कार्यालयाला रविवारपासून सीआरपीएफच्या जवानांचा बंदोबस्त देण्यात आला असून या ठिकाणी एका अधिका-यासह अनेक जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या