19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeनांदेडलम्पिस्कीन आजार प्रतिबंधासाठी उपचार शिबिराला सुरवात

लम्पिस्कीन आजार प्रतिबंधासाठी उपचार शिबिराला सुरवात

एकमत ऑनलाईन

किनवट : संपूर्ण जगाला कोरोना आजारानंतर आता जनावरांना लम्पिस्कीन नावाच्या त्वचारोगाने हैराण केले आहे . हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली ,नांदेड, यवतमाळ जिल्ह्यात या रोगाने शिरकावाची चाहूल लागताच खासदार हेमंत पाटील यांनी या पार्श्वभूमीवर पशुधन अधिका-यांशी संपर्क साधून आजाराबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या आणि संपूर्ण जिल्हाभर जनजागृती मोहीम राबवून बाधित जनावरांना औषध उपचार करण्यात यावेत याकरिता शिबिरांचे आयोजन करावे अश्या सूचना दिल्यानंतर तात्काळ यावर अंलबजावणी होऊन उपचार शिबिरांना सुरवात झाली आहे.

पावसाळ्यात जनावरांना लाळ्या खुरकूत , फ-या , घटसर्प या सारखे आजार मोठ्या प्रमाणात होता असतात पण यंदाच्या पावसाळ्यात मात्र लम्पिस्किन या त्वचारोगाने भर टाकली आहे . संपूर्ण जग कोरोना आजाराने मागील ६ महिन्यापासून हैराण असताना भारतात जनावरांना सुद्धा आजाराची लागण होत आहे .प्रामुख्याने गाय आणि बैल यांच्यामध्ये लम्पिस्कीन आजाराचे प्रमाण मोठ्याप्रमाणात आढळून येत आहे . या आजाराचा शिरकाव हिंगोली लोकसभा मतदार संघात झाल्याच्या घटना समोर येऊ लागतच खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ मतदार संघातील हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्ह्याच्या पशुधन विकास अधिका-यांना संपर्क साधून या आजाराबाबत परिपूर्ण माहिती घेऊन कश्यामुळे संसर्ग होत आहे याचा शोध घेऊन यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अश्या सूचना दिल्या आणि संपूर्ण मतदार संघातील पशु पालकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने यंत्रणा कामाला लावावी असे आदेश दिले.

मतदार संघात मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याने पशूंची काळजी घेण्याबाबत ग्रामीण भागापर्यंत जनजागृती करावी, आजाराची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ पशुधन अधिका-्यांशी किंवा पशु पर्यवेक्षकांनी संपर्क साधावा . यासाठी उपायोजना म्हणून मतदारसंघातील ग्रामीण भागातील पशु वैद्यकीय दवाखाने संपूर्ण सुविधेसह आणि औषधांनी सुसज्ज करावीत आणि यंत्रणा गतिमान करावी असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.यावर हिंगोली ,नांदेड ,आणि यवतमाळ जिल्ह्याचा पशु सवंर्धन विभाग कामाला लागला आहे.

ग्रामीण भागात रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जनावरांवर औषध फवारणी गोठा जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे . तसेच मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली असून पशुपालकांना रोगाची माहिती आणि त्यावरील उपाय याची दिली जात आहे .अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी हैराण झाला आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरवाला गेला आहे आणि आता जनावरांना रोगाची लागण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत यामुळे याघटनेला गांभीयार्ने घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वेग वाढवावा असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.

सेल्फी घेण्याच्या नादात मासेमारीसाठी गेलेल्या 2 मुलांना आईसमोरच जलसमाधी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या