30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडजीवनावश्यक वस्तूचे भाव पुन्हा वधारले; लॉकडाउन वाढल्याचा परिणाम

जीवनावश्यक वस्तूचे भाव पुन्हा वधारले; लॉकडाउन वाढल्याचा परिणाम

एकमत ऑनलाईन

देगलूर (नरसिंग अन्नमवार) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहे. मालवाहतूक ठप्प असल्याचे कारण पुढे करीत ठोक व्यापाऱ्यांनी १५ ते २० टक्‍क्‍यांनी सर्व मालावर सर्रास वाढ केल्याचे दिसून येत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने ग्राहकांची लूट सुरू आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी सोशल डिस्टिंक्शन हाच एकमेव पर्याय आहे. १४ एप्रिल पर्यंतचे लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत करण्यात आले.नागरिकांची परवड होऊ नये याकरिता शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू ठेवला आहे. पण याचाच फायदा ठोक व्यापारी घेत आहेत. त्याचीच एक साखळीच आहे लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक या सर्व वस्तूंचे भाव वाढले आहे.

अनेक व्यापारी एमआरपी पेक्षा चढ्या दराने मालाची विक्री करीत आहेत .आता तर 30 एप्रिल पर्यंतची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. शासनाने अन्नधान्याची कमतरता पडणार नाही असे सांगितले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचा पुरवठा सुद्धा सुरू आहे .असे असतानाही वस्तूच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. तेलापासुन तर तिखठापर्यंत भाव वाढल्याने गोरगरिबांना याची झळ पोहोचत आहे .महिन्याकाठी लागणाऱ्या किराणासाठी तीनशे ते चारशे रुपये अतिरिक्त द्यावे लागत असल्याचे नागरिक बोलत आहेत. लॉकडाऊन चा फायदा घेत चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणा-्या दुकानदाराकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे

मुगडाळ शंभरीपार
उन्हाळ्यात महिला मूगवड्या तयार करून ठेवतात या डाळीला उन्हाळ्यात विशेष मागणी असते. लॉकडाऊनच्या पूर्वी मुगडाळ नव्वद रुपये किलो होती. तर आता 110 रुपये किलोवर पोहोचली आहे. त्यामुळे वड्या घालाव्या की नाही असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.

व्यापारी मालामाल
लॉकडाऊनपूर्वी ज्या व्यापा-्यांनी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करून ठेवला होता.एकही वस्तू नाही .ज्याचे भाव वाढले आहे. 400 किलो मिळणारी सुपारी सध्या सहाशे रुपये किलो दराने चालू आहे.

नवर्याच्या मृत्युची बातमी कळताच, एका मुलासह पत्नीने तळ्यात उडी मारून केली आत्महत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या