18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडआसना नदीवरील नव्या पुलाचे काम पुर्णत्वास

आसना नदीवरील नव्या पुलाचे काम पुर्णत्वास

एकमत ऑनलाईन

नांदेड: शहरालगत असलेल्या आसना नदीवरील जुन्या निजामकालीन पुलाच्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या नव्या पुलाचे काम पुर्णत्वास आले आहे. या पुलावर जॉगींग, वॉकिंग ट्रॅक आणि आकर्षक स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या पुलामुळे भोकरचा मार्गही सुकर होणार असून लवकरच पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. पालकमंत्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळेत या पुलाचे दर्जेदार काम करण्यात आले आहे,असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.

नांदेड-नागपूर महामार्गावरील आसना नदीवरील निजामकालीन पुल अंत्यत जुना आणि धोकादायक बनला होता. दोन ते तीन वर्षापुर्वी स्ट्रक्चलर ऑडीटमध्ये राज्यातील अन्य काही पुलासह हा पुल धोकादायक असल्याचे नमुद केले होते.यामुळे वाहतुकीस हा जुना पुल बंद करण्यात आला होता.
यामुळे शेजारी असलेल्या एकाच पुलावरून वाहनांची वाहतूक सुरू होती. या महामार्गावर वाहतुकीची वर्दळ अधिक असल्याने, पर्यायी पुलावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे वाहनधारकाना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सदरील नदीवरील जुन्या निजामकाळातील पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यास मंजूरी देऊन यासाठी जवळपास ३० कोटी रुपयांच्या निधीस तात्काळ मंजुरी दिली.

तसेच सदरील काम वेगाने व दर्जेदार करण्यासाठी आठ महिन्यांपूर्वी या पुलाच्या कामास सुरवात करण्यात आली होती. लोकांच्या सेवेत लवकरात लवकर हा पूल कामात यावा यासाठी रात्रदिवस या पुलाचे काम सुरू आहे. सध्या या पुलाचे काम पूर्णत्वास आले असून, सदरील पुलावर जॉगींग, वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्यात आले आहेत.यासह पुलावर आकर्षक स्ट्रीट लाईटद्वारे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी ही आकर्षक विद्युत रोषणाई रस्त्यावरील येणा-या जाणा-यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पुलामुळे आता भोकरचा मार्ग ही सुकर होणार आहे. सदरील पुलाचे बांधकाम पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जातीने लक्ष देत अगदी कमी वेळेत आणि दर्जेदार करून घेतले आहे,असा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे.नव्याने निर्माण करण्यात आलेल्या या पुलाचा लवकरच ना. चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार असून हा पूल कधी रहदारीसाठी सुरू होईल याची उत्सुकता लागली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या