24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडसीमोल्लंघनाने माहूरगडच्या नवरात्र महोत्सवाची सांगता

सीमोल्लंघनाने माहूरगडच्या नवरात्र महोत्सवाची सांगता

एकमत ऑनलाईन

माहूर : साडेतीन शक्तिपिठापैकी एक व मूळपीठ म्हणून प्रख्यात असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकामाता मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदा दि.७ ऑक्टो. रोज गुरुवारला उदे उदे ग, अंबाबाई च्या गजरात मोठ्या भक्तिभावात व उत्साहात घटस्थापना संपन्न झाली. उत्सव काळात दररोज नऊ दिवस मातेला वेग वेगळ्या रंगाची पैठणी नेसवून अलंकार महापूजा, नैवेद्य, दुर्गा सप्तशती पाठ वाचन, परिसर देवता पूजन छबिना, कुमारिका पूजन, होमहवन, पूणार्हूती व विजया दशमीला सिमोलंघन आदि धार्मिक विधीने दस-्याच्या शुभ मुहूर्तावर यावर्षीच्या नवरात्र महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.

आल्हाददायक वातावरणात भाविकांना मातेचे दर्शन घडावे म्हणून संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार राकेश गिड्डे यांचे मार्गदर्शनात विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काणाव आशिष जोशी,अरविंद देव, दुगार्दास भोपी व पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी, अधिक्षक योगेश साबळे यांनी

मंदिराच्या पायरीवर भव्य कापडी मंडप उभारून शुद्ध पीण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. कोरोना पासून संरक्षण होण्यासाठी सॅनिटाझर व मास्कची व्यवस्था केली. गडावर ये -जा करण्यासाठी परिवहन महामंडळाने पुरेशा बसेस उपलब्ध करुन दिल्या,अनेक अडचणी आल्या तरी विद्युत वितरण कंपनीने अखंड विद्युत पुरवठा केला,सार्वजनिक बांधकाम विभागाने अगदी कमी वेळात महामार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याची डागडूगी केली, वाहनतळ,स्वच्छता, नियंत्रण कक्ष, फिरते शौचालय,पाणी, पथदिवे आदि जबाबदारी नगर पंचायतने उचलली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नामदेव रीठे, स.पो.नि. अण्णासाहेब पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. अशा प्रकारे यात्रेशी निगडित असलेल्या विभागाने आपली जबाबदारी चोखपणे बजावल्याने यावषीर्ची यात्रा निर्विघ्नपणे पार पडली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या