26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeनांदेडदारूड्या तरूणाचा पोलिस ठाण्यात गोंधळ

दारूड्या तरूणाचा पोलिस ठाण्यात गोंधळ

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : दारूच्या नशेत एका तरूणाने रात्रीच्या वेळी चक्क पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याची घटना दिनांक २९ जुलै रोजी साडे दहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिला पोलिस कर्मचारी कोमल कांगणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे तरूणावर हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी, दि़ २९ जुलै रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास येथील पोलिस ठाण्यातील कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामात होते. यावेळी मौजे एकंबा येथील २२ वर्षीय आरोपी तरूण परमेश्वर सुभाष खानजोडे यांनी दारूच्या नशेत थेट पोलिस ठाण्यात दाखल झाला. आत येताच त्याने गोंधळ घालण्यास सुरू केले. उपस्थित कर्मचा-यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र काही उपयोग झाला नाही. अखेर गोंधळ न थांबल्याने महिला पोलिस कर्मचारी कोमल कांगणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु. र. न १७७ कलम महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ८५ (१) प्रमाणे आरोपी विरुद्ध हिमायतनगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचा पुढील तपास बिट जमादार अशोक सिंगनवाड हे करीत आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यापासून हिमायतनगर शहरात आठवडी बाजारच्या दिवशी अनेक ठिकाणी दारुडे गोंधळ घालत असतात. तर ठिकठिकाणी उघड्यावर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात, या दारूड्यांचाही बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी होत आहे़यावर पोलिस निरीक्षक बी. डी. भुसनुर यांनी, यापुढे शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारु पिऊन गोंधळ घातल्यास किंवा गैरवर्तन करताना आढळून आल्यास करण्यात असे सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या