26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडकॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना

कॉंग्रेस नगरसेवकाची रुग्णालयातील कर्मचा-यांवर दबंगगिरी; नांदेड येथील घटना

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरातील शामनगर येथील शासकीय स्त्री रूग्णालयात कॉंगे्रस नगरसेवक महेंद्र पिंपळे यांनी दबंगगिरी करित एका कर्मचा-यास मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली.सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेला मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हॉयरल झाला होता. दुस-या दिवशी मंगळवारी मारहाणीच्या या घटनेचा रूग्णालयातील कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून निषेध केला.यानंतर सायंकाळी उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस नांदेड शहरात कमी होत आहे. रुग्णांची संख्या देखील घटत आहे. त्यामुळे शहरात कुठल्याही रुग्णालयात भाऊ गर्दी दिसून येत नाही. अशा परिस्थितीत शामनगर येथील शासकीय रुग्णालयात शांततेत कामकाज सुरु असतांना सोमवारी कॉंग्रेस नगरसेवकाने आपल्या एका रुग्णास उपचार होत नसल्याची तक्रार करत तेथील एका औषधी विभागात काम करणा-या कर्मचा-याशी हुज्जत घालत मारहाण केल्यामुळे शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेला मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हॉयरल झाला होता.लोकप्रनिधीच्या या वर्तनाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. शामनगर येथील शासकिय रुग्णालयात कोरोना लस लग्गेबाजीने देण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक महेंद्र पिंपळे यांना मिळाल्याने सोमवारी सकाळी ते जाब विचारण्यासाठी रुग्णालयात गेले असता डॉ. पल्लेवाड यांनी त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. यावरुन कर्मचारी शिवराज निवृत्ती तळेगावे यांच्यात वाद झाला. नगरसेवक पिंपळे यांनी त्यांना मारहाण केली.मारहाणीचा हा प्रकार रूग्णालयातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला.

मंगळवारी कर्मचा-यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरत दिवसभर काळ्या फिती लावून मारहाणीचा निषेध केला. सायंकाळी उशीरा रूग्णालयातील कर्मचारी शिवराज तळेगावे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नगरसेवक महेंद्र पिंपळे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती येथील पोलिस अंमलदारांनी दिली.

लग्गेबाजीने लसचे वितरण: पिंपळे
कोरोनाची लस घेण्यासाठी मध्य रात्री २ वाजल्यापासून सर्व सामान्य नागरिक रांगेत उभेराहून लस मिळविण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, येथील डॉ.पल्लेवाड हे आपल्या मर्जितील लग्गेबाजिने १०० लस पैकी ३० ते ४० जणांना मागच्या दाराने लस देण्यात येत आहे. असा आरोप नगरसेवक पिंपळे यांनी केला. जाब विचारण्यासाठी त्यांनी रुग्णालय गाठले व झालेल्या बाचाबाचीत कर्मच-यासोबत त्यांचा वाद झाला. असे नगरसेवक पिंपळे यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या