23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडगोरठेकरांच्या घर वापसी मुळे कॉंग्रेसची डोखेदुखी

गोरठेकरांच्या घर वापसी मुळे कॉंग्रेसची डोखेदुखी

एकमत ऑनलाईन

धमार्बाद : माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी आमदार राजेश पवारांच्या एकलशाहीला कंटाळून परत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून कांग्रेसची डोकेदुखी वाढवली तर आमदार राजेश पवार यांच्या परत आमदार होण्याच्या स्वप्नातही मोठे अडथळे निर्माण केले. सण २०१९ साली माजी आ बापूसाहेब गोरठेकरांनी मित्र प्रेमासाठी स्वत:ची हक्काची जागा सोडून भोकर विधानसभा मतदारसंघात कट्टर विरोधक यांच्या विरोधात निवडवणूक लढवली व स्वत:च्या मतदारसंघात राजेश पवारांना निवडून आणलं हे जग जाहीर आहे.

पण निवडून येताच राजेश पवार यांनी गोरठेकर यांच्या कार्यकर्त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने स्वत: गोरठेकर कमालीचे नाराज होते त्यामुळेच त्यांनी परत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले भलेही गोरठेकरांना सोशल मीडियात , वर्तमान पत्रात बदनाम करू द्या पण ते एकवचनी व भ्रष्टचारी नाहीत हे उघड सत्य आहे व मित्रता म्हणून चिखलीकरांचे मोठे बंधू नक्की आहेत व राहणार यात शंकाच नाही गोरठेकरांचा कार्यकाळ ज्यांनी बघितला त्यांना गोरठेकर काय आहेत व ते करू शकतात हे माहीतच आहे स्वर्गवासी बाबासाहेब गोरठेकरांनी धमार्बाद व उमरी तालुक्यात इसापूर धरणाचे पाणी मिळावे म्हणून १९९९ मध्ये विलासरावांच्या सरकारला पाठींबा देऊन सरकार स्थापन करण्यास मदत केली पण बदल्यात उमरी व धमार्बाद तालुक्यातील जनतेसाठी पाणी मागितलं पुत्रासाठी महामंडळ नाही ही वास्तविकता आहे.

ज्या मंडळींनी जिल्ह्याचा विकास केला म्हणून गाजावाजा करत आहेत त्यांनी केवळ सासू , जावई , दाजी , याचंच भलं केलं हे जिल्ह्यातील सर्व मराठा नेत्यांना माहीत असून देखील केवळ स्वत:च्या पदासाठी त्यांचे पाय चाटत आहेत पण गोरठेकर , कमलकिशोर कदम किन्हाळकर , केशवराव धोंडगे , व बळवंतराव चव्हाण हे व्यक्ती कधीच चव्हाण यांच्या समोर झुकले नाही वस्तुस्थिती आहे गोरठेकरांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य व विचार करून घेतलेला निर्णय आहे त्यांच्या या निर्णयाचे स्वागत उमरी , धमार्बाद व नायगाव तालुक्यातील जनता करत आहे गोरठेकरांनी अनेकांना घडवलं तस अनेकांना बिघडवल गोरठेकर बेईमान नेता नाही पण रागीट व स्पष्ट बोलून अनेकांची दुष्मनी स्वीकारली ही वस्तुस्थिती

तीन जिल्हा परिषद शाळेत प्लास्टिक तांदूळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या