23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडशिरड येथे नाल्यांचे दुषीत पाणी रस्त्यावर ; आरोग्य धोक्यात

शिरड येथे नाल्यांचे दुषीत पाणी रस्त्यावर ; आरोग्य धोक्यात

एकमत ऑनलाईन

निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या शिरड येथे नाल्यांचे घाण पाणी रस्त्यावर.पावसाळ्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली असून,येथील नागरीकांचे आरोग्य नालीतील रस्त्यावर आलेल्या घाणीमुळे धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देवून नाल्या सफाई करुन गावात स्वच्छता करावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.

गावात पाच हजार नागरिक राहतात. गावाची लोकसंख्या पाच हजारांच्या वर गेलेली असून ग्राम पंचायतचे चार वार्ड असून ग्राम पंचायतची सदस्य संख्या ११ आहे. ग्राम पंचायत ची नविन कार्यकारणी व सरपंच निवड होवून आजघडीला सहा महीने पुर्ण झाले असून, गावातील नागरीकांना नविन सरपंच कधितरी ठोस निर्णय घेवून गाव सुधारणे साठी काम करेल अशा अपेक्षा निवडणूकी पुर्वी गावातील नागरीकांनी बाळगल्या होत्या शिरड येथील ग्रा.पं.चे आरक्षण एसी पुरुषाला सुटल्याने गावातील अनेक मागासवगार्तील तरुण सरपंच पदाच्या शर्यतीत होते.

पण महाराष्ट्राची राजधानी मुंबईत वास्तव्यास असणारा गावातील एक सुशिक्षीत तरुण काही गावातील नागरिकांच्या सांगण्यावरुन आपल्या काकांच्या व वडीलांच्या गावातील प्रतिष्ठेच्या जोरावर गावातील मोजक्याच लोकांची ओळख असूनही ग्रा.पं. निवडणूकीच्या तोंडावर काही दिवसापुर्वी गावात येवून सरपंच पदासाठी निवडणूक लढवली गावातील नागरीकांच्या आशा पल्लवित झाल्या कोणीतरी नविन गावातील तरुण राजधानी मुंबई सारख्या शहरात राहून गावात सरपंच पदासाठी निवडणूक लढवतोय नक्कीच बदल घडणार अशा भावना गावातील नागरिक व्यक्त करीत होते. निवडणूकीच्या पंधरा दिवस आधी गावात दाखल झालेला गावातील कोणत्याही सामन्य नागरीकांची ओळख नसलेला गावामधिल समस्यांची कोणतीच माहीती नसलेल्या तरुणाला गावातील नागरीकांनी भरभरूण मतदान करून सरपंच पदावर विराजमान केले.

मुंबईत राहीलेला गावातील तरुण काहीतरी विशेष काम करेल अशी लोकांना अपेक्षा होती पण सहा महीन्यातच नागरीकांचा अपेक्षा भंग झाला असून, मुंबईत जरी वास्तव्य केलेला सरपंच निवडला असला तरी त्याचा रिमोट गावातल्या जुण्या राजकारण्याच्या हातात असल्याचे गावातील नागरीक बोलत आहेत.त्यामुळे कोणताही निर्णय सरपंचाला स्वत:हा घेता येत नसल्याचे नागरीक बोलत आहेत. गाव विकासापासून कोसो दुर आहे.गावामध्ये कोणत्याही सोई सुविधा नाहीत. ग्रामपंचायतच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.गावातील सेवासहकारी सो.च्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केलेआहे.ग्रामपंचायत हद्दीत सदस्यांच्या पाठींब्यामुळे त्यांच्या जवळचे नातेवाईकच अतिक्रमण करत असल्याचे काही जागरूक नागरीकांनी सांगीतले आहे.

गावातील नागरीकांना पिण्याचे शुद्ध पाणी मीळत नाही. गावातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. ग्राम पंचायतची घर भाडे,पाणी पुरवठा कर अनेक लोकांकडे अनेक वषार्पासुन थकित आहे. गावातील दलित वस्ती सोडली तर प्रत्येक वार्डात आजपर्यंत सिमेंट रस्ते झाले नाहीत एकाच पावसात सर्वत्र चिखल च चिखल झाला आहे. गावातील सर्व नाल्यागाळांनी भरल्या असून नालीतील गाळ पावसाळ्यापुर्वी काढून स्वच्छ केल्या नसल्याने नालीतील घाण पाणी सर्व रस्त्याने वाहत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरीकांना रस्त्यावर आलेल्या घाणीमुळे पायी चालने सुध्दा मुस्कील झाले आहे. शिरड गावातून मनुला रस्ता जातो हा गावातील अंतर्गत रस्ता आहे या रस्त्यावर गावक-्यांनी १ कोटी रुपये खर्च करून महादेव मंदीर बांधले आहे.

मुख्य रस्ता असल्याने मंदीरात दर्शनासाठी रोजच गावातील अनेक भाविक जातात मंदीराच्या मुख्य रस्त्यावरूनच सर्व नालीचे घाण पाणी वाहत आहे. शिरड सह मनुला येथील ये जा करणा-या नागरीकांना सुध्दा याचा त्रास होत असून पावसाळ्यामुळे गावात रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली असून,येथील नागरीकांचे आरोग्य नालीतील रस्त्यावर आलेल्या घाणीमुळे धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देवून नाल्या सफाई करुन गावात स्वच्छता करावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.

मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठीच लढा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या