23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडशिवणी येथील शेतीचे नाल्यात रूपांतर

शिवणी येथील शेतीचे नाल्यात रूपांतर

एकमत ऑनलाईन

शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी येथे ६ व ७ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी पावसामुळे नदी-नाल्या काठच्या जमिनीचे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीन,कापूस पिकाचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. ६ व ७ तारखेच्या रोजी झालेल्या वादळी वारा व अतिवृष्टीने तर कहरच केला गेल्या आठवडया पासून शिवणी व परिसरात वादळी वा-्यासह विजेचा कडकडाट ढगफुटीचा पाऊस झाल्याने शेत जमिनीतील कापूस सोयाबीन पिके आडवी झाली आहेत शिवणी येथील अल्पभूधारक शेतकरी शेत सर्वे नंबर ४६७ शेतकरी विठ्ठल रामलू सिलारवाड, सत्यनारायण रामलु सिलारवाड, गणेश रामलु शिलारवाड या तीन भावंडांची एकूण सहा एकर शेत जमीन असून या सहा एकरातील प्रत्येक कुटुंबाकडे दोन एकरची शेती आहे.

या दोन एकर शेतीवरच आपल्या संसाराचा गाडा हाकत असताना दोन वषार्पूर्वी या शेतीच्या बाजूला असलेल्या नाल्याची खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले होते. एवढे करूनही ६ सप्टेंबर रोजी झालेल्या १३५ मि.मी. पावसामुळे या अल्पभूधारक शेतक-्यांच्या शेतात नाल्या काठचा बांध फुटल्याने पुराचे पाणी शेतीतुन गेल्याने भाजीपाला कापूस सोयाबीन ही पिके जमीनदोस्त झाली व शेतीत नाल्याचे स्वरूप प्राप्त होऊन आता या शेतातूनच नाल्याचे पाणी वाहत आहे याशिवाय नाल्यातून वाहून आलेले दगड रेती वाहून येऊन शेतजमिनीत बसली आहे.

त्या जमिनीत सध्याला कोणती पिके घेता येत नसल्याने या अल्प भूधारक शेतक-या पुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे संमधीत विभागाकडु नाल्याचे बांध फुटल्याने शेती पूर्ण पाने वाया गेली आहे.तर फुटलेला नाल्याची दुरुस्ती करून शेतीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकरी सीलारवार परिवाराकडून मागणी करीत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आशोकराव चव्हाण व जिल्हाधिका-ी विपिन इटनकर साहेबांनी आमच्या गरिब शेतक-्यांचे झालेले नुकसानीची पाहणी करून तात्काक नुकसान भरपाई देऊन शेतीची दुरुस्ती करून द्यावी नुकसान ग्रस्त शेतकरी गणेश सिलरवाड परिवार मागणी करीत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या