22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडआॅफलाईन-आॅनलाईन अध्यापन पद्धतीत समन्वय साधावा

आॅफलाईन-आॅनलाईन अध्यापन पद्धतीत समन्वय साधावा

एकमत ऑनलाईन

नांदेड : श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित डी.एड.-बी.एड. कॉलेज नांदेड संयुक्त विद्यमाने, डॉ. शंकरराव भाऊराव चव्हाण व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त ह्यसद्यकालीन परिस्थिती : शिक्षण आणि शिक्षक या विषयावर एक दिवसीय वेबिनार व ‘शिक्षक व्यक्तिमत्त्व : आकलन आणि विश्‍लेषण’या संपादित ग्रंथाचे आॅनलाईन प्रकाशन मा. कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ.ए.आर. राऊत तर प्रमुख वक्ते मा.डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वा.रा.ती.म.वि., कैलाश पब्लिकेशनचे के.एस. अतकरे, समारोप सत्राचे प्रमुख वक्ते डॉ. माधव जाधव, मीनाक्षी आचमे-चित्तरवाड हे होते.

वेबिनारच्या अनुषंगाने डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की, आॅनलाईन शिक्षण पद्धती कोणत्याही वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य नसते. कारण शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये ह्यसमोरा-समोरह्ण संपर्क नसतो. परंतु कोरोना व्हायरसच्या संसगार्मुळे आॅनलाईन कॉन्फरन्सद्वारे शिक्षण चालू ठेवणे आवश्यक ठरले आहे. परंतु नंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर वगार्तील शिक्षणाबरोबरच ती पूर्ववत करायला हवी. आॅनलाईन शिक्षण पद्धतीत पूर्ण क्षमतेने उतरावे लागेल. आॅफलाईन-आॅनलाईन शिक्षणाचा समन्वय साधला पाहिजे असे प्रतिपादन केले. डॉ. विद्यासागर पुढे असेही म्हणाले की, शेवटी शिक्षणातून संवेदनशील माणूस घडला पाहिजे हा शिक्षणाचा अंतिम उद्देश आहे आणि तो माणूस जागतिक नागरिकत्व स्वीकारणारा असावा असे आवाहन केले.

प्रकाशकीय भूमिका मांडताना के.एस. अतकरे म्हणाले की, ह्यशिक्षक व्यक्तिमत्त्व : आकलन आणि विश्‍लेषण या संपादित ग्रंथाने शिक्षकाच्या जबाबदारीचे भान दिले आहे. सद्यकालीन परिस्थिती ही डॉ. यशवंत मनोहर यांच्या मतानुसार अग्निपरीक्षेचा काळ आहे. आपले शिक्षण हे चौकटीच्या बाहेर नेले पाहिजे. शिक्षक हा बहुश्रुत असावा. विद्यार्थ्यांची कुवत आणि क्षमता लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन करावे असे डॉ. माधव जाधव यांनी म्हटले. आजचे युग हे ह्यमाहिती तंत्रज्ञानाचे असून ती एक मूलभूत गरज बनली आहे. ह्यतंत्रज्ञानाकडून ज्ञानाकडे या नव्या शैक्षणिक संकल्पनाद्वारे शिक्षकाने स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसीत करून या प्रती जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे असे सहशिक्षिका मीनाक्षी आचमे यांनी म्हटले आहे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ.ए.आर. राऊत म्हणाल्या, वेबिनार राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवर असू शकतात. परंतु दिलेल्या परिस्थितीत शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या वेबिनारच्या अनुषंगाने संस्थेचे सचिव व माजी राज्यमंत्री मा.डी.पी. सावंत, प्रसिद्ध विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांचेही आशीर्वाद लाभले. माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, प्रसिद्ध विचारवंत डॉ. अनंत राऊत, प्राचार्य बी.बी. पुटवाड, प्रा.विजयकुमार पाईकराव, सतीश कुलकर्णी, प्राचार्य मो. अर्शद, प्राचार्या डॉ. सुनंदा रोडगे, प्रा. सु.ग. जाधव, डॉ. शंकर विभुते, डॉ. जगन्नाथ कापसे, प्रा. प्रियदर्शन भवरे, माजी गटशिक्षणाधिकारी एम.आर. राठोड, प्रा.डी.आर. नालमवार, चंद्रकांत घोलप आदी. संपादित ग्रंथातील या लेखकांचा सहभाग लाभला.

सत्राचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. रंगनाथ नवघडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सहकारी, प्रा.म. अल्ताफ, ग्रंथपाल राम कदम, डॉ.एम.एन.अंभोरे, प्रा.एन.पी. लोखंडे, जे.ए. भोस्कर, डी.व्ही. चिद्दरवार, व्ही.पी. मस्के, एम.आर. जोशी, ए.एम. कांबळे, यू.जी. सरोदे, पवार आदी. प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसह १०० जणांनी सहभाग घेतला. कल्पक दृष्टीने तंत्रज्ञ म्हणून विजयकुमार चित्तरवाड यांची चांगली भूमिका निभावली.

प्डॉ. जगन्नाथ कापसे, प्रा. प्रियदर्शन भवरे, माजी गटशिक्षणाधिकारी एम.आर. राठोड, प्रा.डी.आर. नालमवार, चंद्रकांत घोलप आदी. संपादित ग्रंथातील या लेखकांचा सहभाग लाभला. सत्राचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. रंगनाथ नवघडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सहकारी, प्रा.म. अल्ताफ, ग्रंथपाल राम कदम, डॉ.एम.एन.अंभोरे, प्रा.एन.पी. लोखंडे, जे.ए. भोस्कर, डी.व्ही. चिद्दरवार, व्ही.पी. मस्के, एम.आर. जोशी, ए.एम. कांबळे, यू.जी. सरोदे, पवार आदी. प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसह १०० जणांनी सहभाग घेतला. कल्पक दृष्टीने तंत्रज्ञ म्हणून विजयकुमार चित्तरवाड यांची चांगली भूमिका निभावली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या